शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्तीच्या नावाखाली अमानुष मारहाण, अल्पवयीन मुलगा पडला बेशुद्ध, सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 05:23 IST

विनेगाव येथे सुरू असणाऱ्या एका व्यसनमुक्ती केंद्रात व्यसन सोडविण्यासाठी आलेल्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. बेल्ट, सिगारेटचे चटके, दोरीने बांधून उलटे टांगणे, काठीने बांधून लटकवणे अशा अघोरी अमानुष पद्धती येथे व्यसन सोडविण्यासाठी वापरल्या जात होत्या.

खालापूर : तालुक्यातील विनेगाव येथे सुरू असणाऱ्या एका व्यसनमुक्ती केंद्रात व्यसन सोडविण्यासाठी आलेल्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. बेल्ट, सिगारेटचे चटके, दोरीने बांधून उलटे टांगणे, काठीने बांधून लटकवणे अशा अघोरी अमानुष पद्धती येथे व्यसन सोडविण्यासाठी वापरल्या जात होत्या. अशाच प्रकारे येथे एका १३ वर्षीय मुलावर करण्यात आलेले अत्याचार त्याच्या आईमुळे उघडकीस आले. त्यानंतर, त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार खालापूर पोलिसांनी केंद्र चालक प्रदीप भगवानदास पटेल, मल्हार प्रदीप पटेल (राहणार मुंबई) या दोघांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे .रायगड जिल्ह्याच्या मुंबई-पुणे महामार्गावरील विनेगाव येथील मॉटेरिया रिसॉर्टजवळील मुंबईतील बेटर लाइफ फाउंडेशनचे व्यसनमुक्ती केंद्र कृष्णा माई या बंगल्यात मागील काही वर्षांपासून सुरू आहे. पन्नासहून अधिक लोक या व्यसनमुक्ती केंद्रात भरती झाले आहेत. यात हनी त्यागी हा १३ वर्षीय मुलगादेखील आहे. मंगळवार, १३ मार्च रोजी हनीची आई अलिशा त्यागी मुलाला भेटण्यासाठी बेटर लाइफ संस्थेत आल्या. त्या वेळी हनी बेशुद्धावस्थेत आढळून आला. हनीच्या आईला हनीला भेटण्यास मज्जाव करण्यात आला. अखेर मोठ्या धाडसाने हनीच्या आईने केंद्रात प्रवेश करून हनीची सुटका करून घेतली आणि थेट खालापूर पोलीस स्टेशन गाठले. सुरुवातीला हनीवर चौक ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी हनीला नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.>सर्वांवरच होतात अत्याचारव्यसनमुक्ती करण्याचे सोडून बेटर लाइफ संस्थेकडून केंद्रात रोजच सर्वांवर अत्याचार करण्यात येत असल्याचे म्हणणे पीडितांनी माध्यमांसमोर मांडले आहे. बेल्ट, सिगारेटचे चटके, दोरीने बांधून उलटे टांगणे, काठीने बांधून लटकवणे अशा अघोरी अमानुष पद्धतीने अत्याचार करण्यात येतो, असे येथील पीडित कांबळे यांनी सांगितले.व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आम्ही उपचार घेण्यासाठी आलो आहोत. परंतु येथे उपचाराच्या नावाखाली अमानुष छळ करण्यात येत असून याची वाच्यता आतापर्यंत आम्ही कुठेही करू शकत नव्हतो. व्यसनातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मानसिक आधार देण्याऐवजी येथे होणारा शारीरिक छळ हा जीवघेणा आहे, असेही काहींनी सांगितले.>पद्धत घातक व्यसनमुक्तीसाठी अमानुष मारहाण हा मार्ग नाही. मुळात व्यसनमुक्ती केंद्र चालविणारे डॉक्टर असावेत. त्यातही अन्न औषध प्रशासनाने मान्यता दिलेली औषधेच वापरण्यात यावीत. अशा प्रकारे अघोरी आणि अमानुष अत्याचार करण्याची पद्धत अत्यंत घातक आहे. नागरिकांनी सजग होऊन केंद्राच्या परवान्यासह त्याची पूर्ण माहिती घेऊनच व्यसनमुक्ती केंद्राची निवड करावी.- डॉ. बबन नागरगोजे, व्यसनमुक्ती चळवळ कार्यकर्ते, खोपोली.परवाना नव्हता : मुळात हे केंद्र चालविण्यासाठी कसलाही परवाना नसल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे केंद्र चालविण्यासाठी अनेक परवानग्या आवश्यक असून, या घटनेची नोंद घेतली आहे. यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.- जे.ए.शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खालापूर.कडक कारवाई व्हावी : अमानुष वागण्यालाही एक सीमा असते, ही सीमारेषा कधीच बेटर लाइफ संस्था केंद्राने ओलांडली आहे. प्रत्येकाच्या शरीरावर मारहाणीचे व्रण उठलेत. १३ वर्षांचा हनीला खूपच लागले आहे. हे केंद्र चालविणाºयांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.- अलिशा त्यागी, हनीची आई, नवी मुंबई.