शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भोरला वर्षभरात सहा बळी

By admin | Updated: October 13, 2016 02:18 IST

खोदून ठेवलेले रस्ते, चाऱ्या, उगवलेली झाडेझुडपे, पुलांना संरक्षक कठडे नाहीत, सूचना फलक, गटारे काढलेली नाहीत, तर जीर्ण झाडे रस्त्यावर पडलेली...असा कारभार

भोर : खोदून ठेवलेले रस्ते, चाऱ्या, उगवलेली झाडेझुडपे, पुलांना संरक्षक कठडे नाहीत, सूचना फलक, गटारे काढलेली नाहीत, तर जीर्ण झाडे रस्त्यावर पडलेली...असा कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाचा सुरू असून, यामुळे वर्षभरात अपघातांत सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. यात तीन तरुण, एक महिला, एक पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे.या शिवाय चारचाकी गाड्या पुलावरून खाली पडून, दुचाकी गाड्या घसरून अनेकजण जखमी, तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या एका अपघात प्रकरणी उपअभियंत्यावर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार भोर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांनी ३0४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महाड-पंढरपूर रोडवर नांदगाव, आपटी व भोर-आंबवडे रोडवर अनेक ठिकाणी शेतीची पाइपलाइन टाकण्यासाठी चाऱ्या काढल्या आहेत. मात्र, त्या व्यवस्थित बुजवल्या नाहीत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी गाड्यांचे अपघात घडतात. नांदगाव येथील काढलेल्या चारीच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने महाडला जाणारा दुचाकीस्वार खड्ड्यत पडला आणि समोरून येणारा टेम्पो अंगावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर आंबेघर येथील नीरानदीवरील पुलाजवळ संरक्षक कठडे नसल्याने गेल्या वर्षी पहाटेच्या वेळी चारचाकी गाडी नीरानदीत पडून गाडीतील दोन पुरुष व दोन महिलांचा, एक वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही. भोर-कापूरव्होळ, भोर-शिरवळ रोडवर जुनी झाडे वाळली असून, कधीही पडण्याच्या अवस्थेत आहेत. खड्डे पडले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तीन दिवसांपूर्वी भोर शहरातील भोर-शिरवळ रस्त्यावर एसटी डेपोजवळ भर रस्त्यात सकाळी ११ वाजता पडलेले बाभळीचे झाड सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले नाही आणि दुचाकी घसरुन अपघात झाले. तरीही ती झाडे न काढल्याने रात्री एक दुचाकी झाडवर आदळून अपघात झाला. यात राहुल दुरकर हा तरुण जागीच ठार झाला, तर अक्षय महांगरे गंभीर जखमी झाला. यामुळे जखमी तरुणाचे चुलते चंद्रकांत महांगरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धारणे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शंकर दराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यानुसार पोलिसांनी कामात हलगर्जीपणा केल्या बद्धल ३0४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)