शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील साडे सहा लाख महिलांना मिळाला नव-याच्या मालमत्तेत हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 20:36 IST

जिल्हा परिषदेने घेतलेल्या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील तब्बल 6 लाख 42 हजार 86 महिलांना नव-याच्या मालमत्तेत हक्क

पुणे : जिल्हा परिषदेने घेतलेल्या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील तब्बल 6 लाख 42 हजार 86 महिलांना नव-याच्या मालमत्तेत हक्क मिळाला आहे. अद्यापही 40 टक्के घरांमध्ये महिलांना त्याचा हक्क दिला नसून, शिल्लक कुटुंबांनी ही प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेने पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी महाफेरफार अभियानांतर्गत मिळकत पत्रिकेवर (आठ-अ) महिलांची नावे समाविष्ट करण्यासाठी खास शिबिरांचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषदेच्या आवाहनाला अनेक घरांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. स्वामित्व योजनेंतर्गत घरातील गृहिणींला मालमत्तेची मालकी हा सक्षमीकरणाचा महत्त्वाचा भाग असून, यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. 

जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना सूचना देऊन त्यांच्या हद्दीतील मिळकत पत्रिकेवर महिलांची नावे समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायतींनी मिळकत पत्रिकेवर महिलांची नावे लावण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये मिळकत पत्रिका किंवा आठ-अ यांचे वितरण, त्यावर महिलांचे नाव देणे, आठ-अमध्ये महिलांची नावे समाविष्ट करण्यासाठी अर्ज घेणे प्रक्रियेला वेळ लागत असला तरी चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आठ अ मिळकतीची एकूण संख्या 10 लाख 11 हजार ऐवढी असून,  त्यापैकी आतापर्यंत 6 लाख 42 हजार 86 आठ अ वर महिलांची नावे समाविष्ट झाली आहेत. शिल्लक कुटुंबांनी देखील त्वरीत पुढाकार घेऊन मिळकतीमध्ये महिलांची नावे समाविष्ट करावी, असे आवाहन आयुष प्रसाद यांनी केले.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ अ मध्ये महिलांची नावे समाविष्ट झालेली तालुकानिहाय संख्या 

जुन्नर- 77085, आंबेगाव- 39887, खेड- 66640, शिरूर- 66438, मुळशी - 40679, मावळ - 52223, हवेली - 53907, दौंड- 58221, वेल्हा - 15761, पुरंदर- 37231, बारामती - 47837, इंदापूर- 54257, भोर - 31920, एकूण : 642086

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषदcollectorजिल्हाधिकारी