शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देशात रोजगाराची परिस्थिती भयानक : नरसय्या आडम : पुण्यात 'साहित्य संस्कृती संमेलन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 12:51 IST

देशात शिक्षण आणि रोजगाराची परिस्थिती भयानक होत चालली आहे, अशी खंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस नरसय्या आडम यांनी व्यक्त केली. साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

ठळक मुद्देआडम यांच्या हस्ते करण्यात आले साहित्य संस्कृती संमेलनाचे उद्घाटनविषमता वाढल्यामुळे समाज मागे जातो, यासाठी आर्थिक राजकारण कारणीभूत : मुक्ता मनोहर

पुणे : भारतात बावीस कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी सत्तर लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात व इतर फक्त दहावी, बारावीपर्यंतच शिकतात त्यामुळे साक्षरतेचे प्रमाण कमी होऊन पुढे रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही. म्हणूनच देशात शिक्षण आणि रोजगाराची परिस्थिती भयानक होत चालली आहे, अशी खंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस नरसय्या आडम यांनी व्यक्त केली.दलित युवक आयोजित पहिल्या सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. आडम यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संमेलन अध्यक्ष लोककलावंत सरुबाई वाघमारे, पुणे मनपा कामगार युनियन अध्यक्ष मुक्ता मनोहर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश राक्षे, दलित युवक आंदोलन अध्यक्ष सचिन बगाडे, ज्येष्ठ कार्यकर्त्या कलावती तुपसुंदर, भारिप सरचिटणीस वसंत साळवे, नगरसेवक सुभाष जगताप, मार्गदर्शक अंकत सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, वैशाली थोरात आदी उपस्थित होते.आडम म्हणाले, १९९५-९६ नंतर जागतिकीकरण आणि खासगीकरण झाले तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर नेत्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल असे सांगितले. त्यानंतर चोवीस वर्षांत बारा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि महाराष्ट्र त्यामध्ये सर्वांत पुढे आहे. ही फारच वाईट गोष्ट आहे. मोदी आल्यापासून यामध्ये ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  मुक्ता मनोहर म्हणाल्या, देशातील विषमता वाढल्यामुळे समाज मागे जातो, यासाठी आर्थिक राजकारण कारणीभूत आहे. आजही तंत्रज्ञान आपण विकसित करू शकलो नाही. हे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. बगाडे म्हणाले, ज्योतिबांनी  स्रियांना ज्ञानाचा हक्क मिळवून दिला. आणि त्यानंतर लहुजी साळवे यांनी आपली मुलगी मुक्ता साळवे हिला शाळेत प्रवेश घेऊन दिला. मुक्ता साळवे ही शाळेत जाणारी पहिली विद्यार्थिनी ठरली. वयाच्या बाराव्या वर्षांपासून मुक्ता यांनी साहित्य लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी साहित्यातून दलितांच्या दु:खाविषयी आणि विषमतावादी गोष्टी समाजासमोर मांडल्या. भारतात साक्षरतेचे प्रमाण कमी असताना शासनाने शाळाबंदीचा निर्णय घेतला. ही फारच धोकादायक बाब आहे. मुक्ता साळवे यांच्या साहित्यातून शिक्षणाबद्दल अनेक उत्तम उदाहरणे मांडली आहेत, तर या संमेलनद्वारे त्या समाजात पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

टॅग्स :Narsayya Adamनरसय्या आडमPuneपुणेManmohan Singhमनमोहन सिंगtechnologyतंत्रज्ञान