शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

ॲड. प्रवीण चव्हाणांच्या तपासासाठी ‘एसआयटी’, पाच सदस्यीय पथक करणार चौकशी, जबाब नोंदणीचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 11:12 IST

Pravin Chavan: ‘बीएचआर’ प्रकरणातील तत्कालीन सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

जळगाव : ‘बीएचआर’ प्रकरणातील तत्कालीन सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पाचजणांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येणार आहे. 

एक कोटी २० लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार सूरज सुनील झंवर (रा. जळगाव) यांनी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार सुरुवातीला डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या गुन्ह्यात ॲड. प्रवीण पंडित चव्हाण (रा. शिवाजीनगर, पुणे), शेखर मधुकर सोनाळकर (रा. जळगाव), उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव)  हे आरोपी आहेत. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम १६६, २१३, ३८४, ३८५, ३८६, ३८८, ५०६, ३४, १२० ब अंतर्गत  गुन्हा दाखल झाला आहे.

खंडणीची रक्कम चाळीसगाव येथे देण्यात आल्याने हा गुन्हा पुण्यातून जळगाव पोलिसांकडे वर्ग झाला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेमार्फत करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या पथकात पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, प्रत्येकी दोन हवालदार व नाईकांचा समावेश आहे.

सुनील झंवर यांचा जबाबया पथकाने गेल्या आठवड्यात फिर्यादीचे वडील सुनील झंवर यांना एक पत्र दिले. जबाब नोंदविण्याकामी हजर राहण्याविषयी पत्राद्वारे कळविण्यात आले. त्यानुसार दि. १ फेब्रुवारी रोजी झंवर यांचा जबाब एसआयटी पथकाने नोंदविला आहे. तसेच झंवर यांच्याकडून काही पुराव्यांसह दस्तऐवजही एसआयटीने ताब्यात घेतले आहेत.

काय आहे प्रकरण? जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सोसायटीच्या संचालकांविरोधात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मालमत्तेची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले होते. अवसायकाने ई-लिलाव प्रक्रिया राबविली होती. तक्रारदार सूरज झंवर यांचे वडील सुनील झंवर यांनी तीन मिळकती ई-लिलाव प्रक्रियेत खरेदी केल्या होत्या. डेक्कन पोलिस ठाण्यात सुनील झंवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जामीन मंजूर करून देणे तसेच गोठविलेली बँक खाती पुन्हा सुरू करण्यासाठी ॲड. चव्हाण यांनी मध्यस्थ उदय पवार, शेखर सोनाळकर यांच्यामार्फत एक कोटी २० लाख रुपयांची खंडणी मागितली, असे झंवर यांनी फिर्यादीत म्हटले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी