शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

"बहिणीने भावला दिले जीवदान, अन् कुठलाही विचार न करता केले यकृत दान"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 17:00 IST

यकृत प्रत्यारोपणासाठी जुळल्यानंतर २ जूनला पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण

ठळक मुद्देकिडनी व यकृत खराब झाल्याचे सांगून तात्काळ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्याला १५ ते २० लाख रुपयांचा अपेक्षित खर्च सांगितला.

भानुदास पऱ्हाड 

शेलपिंपळगाव: बहीण भावाचे नाते नदीच्या प्रवाहाप्रमाणे आयुष्यभर एकमेकांसोबत राहणारे असते. कारण दोघांपैकी कोणावरही संकट उभे राहिले तर ते एकमेकांच्या मदतीला धावून येतात. अशाच बहीण भावाच्या घट्ट नात्याच्या प्रत्यय खेड तालुक्यातील वाडा गावात आला आहे. आपल्या भावावर शारीरिक आजार ओढवल्याने यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता निर्माण झाली. अन कुठलाही विचार न करता बहिणीने आपले यकृत भावासाठी दान केले आहे. 

वाडा - पावडेवाडी येथील शेतकरी गरीब कुटुंबात राहणाऱ्या होमगार्ड पथकातील कुणाल उर्फ कृष्णा दिलीप पावडे या बावीस वर्षीय तरुणाला कर्तव्य बजावत असताना कावीळ आजाराने ग्रासले. मात्र काही दिवसातच आजाराने गंभीर रूप धारण केले. कृष्णाला उपचारासाठी पिंपरी चिंचवडमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित डॉक्टरांनी कृष्णाची किडनी व यकृत खराब झाल्याचे सांगून तात्काळ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्याला  १५ ते २० लाख रुपयांचा अपेक्षित खर्च सांगितला. 

वास्तविक कृष्णाच्या घरची आर्थिक परिस्थिती एकदम हलाकीची असल्याने हा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. मग एवढी मोठी रक्कम कुठून आणायची? हा प्रश्न त्याच्या कुटुंबासमोर उभा राहिला. गावातील तरुणांनी, मित्रांनी, गावकऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी कृष्णाच्या उपचारासाठी सोशल मीडियावर मदतीची साद घातली. त्यातून समाजातील असंख्य मदतीचे हात पुढे आले आहेत. आजपर्यंत अंदाजे ९ ते १० लाख रुपयांची मदत गोळा झाली आहे.

बहिणीचा यकृत दान करण्यासाठी महत्वकांक्षी निर्णय 

दरम्यान कृष्णाची बहीण रेणुका महिंद्रा शिंदे हिने आपल्या भावाला यकृत दान करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. कृष्णाच्या दोन बहिणींपैकी रेणुकाचे यकृत प्रत्यारोपणासाठी जुळल्यानंतर २ जूनला पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. यकृत प्रत्यारोपणानंतर बहीण रेणुका सुखरूप आहे. शेतकरी कुटुंबातील रेणुकाने आपल्या भावासाठी व त्यांचे पती महिंद्रा यांनी मेहुण्यासाठी बायकोला दिलेली साथ स्वागतार्ह असल्याने दोघांच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडhospitalहॉस्पिटलWomenमहिला