शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

आंबेगाव तालुक्यात घोड नगीत बुडून बहीणभावाचा करुण अंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 21:54 IST

घोड नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहीणभावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

ठळक मुद्देवडगाव काशिंंबेग येथील घटना : घटना स्थळी कोणीच नसल्याने मदत मिळू शकली नाही

मंचर : वडगाव काशिंंबेग (ता. आंबेगाव) येथील घोड नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहीणभावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी १२ वाजता घडली. काजल विजय पवार (वय १५) व प्रेम विजय पवार (वय  १०, दोघेही मूळ रा. विश्रांतवाडी, सध्या वडगाव) अशी पाण्यात बुडून मरण पावलेल्या बहीणभावांची नावे आहेत. सुदैवाने काठावरील दोन भावंडे पाण्यात उतरली नसल्याने बालंबाल बचावली. विश्रांतवाडी (पुणे) येथे राहणारे विजय साहेबराव पवार वडगाव काशिंबेग येथे तात्पुरत्या वास्तव्यासाठी आले होते. घिसाडीकाम करून विळे, खुरपे व इतर शेती उपयोगी साहित्य तयार करून त्याची विक्री पवार करतात. सकाळी विजय पवार पत्नी सुरेखा हिला घेऊन चाकण येथील बाजारात विळे व खुरपे विकण्यासाठी गेले होते. त्यांची ४ मुले दिव्या विजय पवार, क्रिश विजय पवार, काजल विजय पवार, प्रेम विजय पवार, आजी कलाबाई भीमराव चव्हाण व मतिमंद चुलतभाऊ सुनील साहेबराव पवार सकाळी साडेअकरा वाजता कपडे धुण्यासाठी घोड नदीवर गेले. वडगाव काशिंबेग येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयाच्या खालील बाजूस ढुमा डोह येथे कपडे धूत असताना गोधडी पिळण्यासाठी एका बाजूला सुनील पवार व दुसºया बाजूला काजल व प्रेम ही दोन मुले पाण्यात उतरली. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने खोलवर पाण्यात पुढे जात काजल पवार व प्रेम बहीण-भाऊ पाण्यात बुडू लागले. बुडत असताना दोघेही हात वर करून वाचविण्यासाठी आवाज देत होते. त्यावेळी दिव्या पवारने सुनील पवार यास बुडणाºया बहीण-भावाला बाहेर काढण्यास सांगितले. मात्र मतिमंद सुनीलला काहीच सुचले नाही. दोन्ही मुले पाण्यात बुडत असताना घोड नदीकाठावर कोणीच नव्हते. दिव्या हिने धावत वडगाव गावात जाऊन ग्रामस्थांना घडलेल्या घटनेची कल्पना दिली. ग्रामस्थ मदतीसाठी नदीकाठावर पोहोचेपर्यंत अर्धा तास झाला होता. दत्ता तारू, एकनाथ तारू या दोन तरुणांनी पाण्यात बुड्या मारून बुडालेल्या बहीण-भावांना बाहेर काढले. दोघा बहीण-भावांंचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना घटनेची 

टॅग्स :ambegaonआंबेगावDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे