शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सिंहगड पुन्हा गजबजला; घाट रस्त्यातील दरडप्रवण भागातील जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 12:25 IST

३० जुलै रोजी दरड कोसळल्याने हा रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता. आता पर्यटकांना गडावर गुलाबी थंडीतील पर्यटनाचा आनंद अनुभवता येणार आहे. 

ठळक मुद्देतीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सिंहगड घाट रस्ता सुरू शनिवार, रविवारी सात हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी दिली भेट; एकूण महसूल ५३ हजार रुपये

खडकवासला : सिंहगड घाट रस्त्यातील दरडप्रवण भागातील जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण झाल्यामुळे पर्यटकांसाठी  खुला करण्यात आला. ३० जुलै रोजी दरड कोसळल्याने हा रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता. आता पर्यटकांना गडावर गुलाबी थंडीतील पर्यटनाचा आनंद अनुभवता येणार आहे. जोरदार पावसामुळे सिंहगड घाट रस्त्यातील दरडप्रवण भागातील दोन तीन वेळा दरडी कोसळल्या होत्या. परंतु ३० जुलै रोजी कोसळलेली दरड प्रशासनासह सर्वांची थरकाप उडवणारी होती. केवळ वनसुरक्षारक्षकांच्या प्रसंगावधानाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. परंतु हजारो पर्यटक गडावर अडकले होते.दरड कोसळल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पर्यटकांना घाट रस्ता बंद करून सार्वजनिक बांधकाम विभागाने दरडप्रवण भागातील धोकादायक वळणांवरील दरडींना आणि दगडांना जाळ्या बसवण्याचे काम चालू होते. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या या रस्त्याने दिवाळीच्या सुटीतही गडावर जाता आले नाही. तथापि, जाळ्या बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे वन विभागाच्या वतीने शनिवारी घाट रस्ता पर्यटकांसाठी सुरू खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 

तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सिंहगड घाट रस्ता सुरू झाला. शनिवार आणि रविवारी सात हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली.वन संरक्षण समितीला दोन दिवसांत ५३ हजार रुपये महसूल मिळाला. १४८४ दुचाकी आणि ४७५ चारचाकी गडावर गेल्या. 

 

सिंहगड घाट रस्ता तात्पुरत्या स्वरूपात पर्यटकांसाठी चालू केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम अंतिम टप्प्यात आले असून  जाळ्यांअभावी थांबले आहे. त्यांच्या जाळ्या आल्यावर रस्ता काही दिवसांसाठी बंद करून जाळ्या बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडून उखडलेला असला तरी या रस्त्यासाठी निधी मंजूर असूनही कामाचे नियोजन झालेले नाही. या कामाचे नियोजन झाल्यावर घाट रस्ता बंद करण्यात येणार आहे. - हेमंत मोरे, वनपरिमंडळ अधिकारी, खानापूर 

टॅग्स :tourismपर्यटनPuneपुणे