शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड घाटात दरड कोसळली, पहाटेची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 02:31 IST

सिंहगड घाट रस्त्यावर रविवारी पहाटे उंबरदांड दरड पॉइंटवर मोठी दरड कोसळली. त्यामुळे गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला असून राडारोडा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

पुणे/खडकवासला : सिंहगड घाट रस्त्यावर रविवारी पहाटे उंबरदांड दरड पॉइंटवर मोठी दरड कोसळली. त्यामुळे गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला असून राडारोडा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले़ रविवारी सिंहगडावर जाणाऱ्यांंची गर्दी असते़ परंतु, दरड कोसळल्याने रस्ता बंद करण्यात आल्याने पर्यटकांची निराशा झाली. सिंहगड घाट रस्त्यावर पायथ्यापासून आठ किलोमीटरवर उंबरदांड दरड पॉइंट आहे. तेथून वर गड एक किलोमीटर राहतो. गेल्या पाच दिवसांपासून सिंहगड परिसरात जोरदार पाऊस चालू असल्याने दरड कोसळली. पहाटे वाहतूक नसल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. पहाटे ४ वाजता गडावरील व्यावसायिक पंडित यादव गडावर जातात. दरड कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित वनविभागास कळवले.वन विभागाचे वनसंरक्षक बाळासाहेब जिवडे यांनी घटना स्थळाची पाहणी करून पोलीस आणि महसूल विभागास कळविले. वन विभागाने सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी सुरक्षेच्या कारणास्तव बंद केल्याचे पहाटे ५ वाजता जाहीर केले.दरम्यान, घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पायगुडे व कैलास जेधे यांनी त्वरित पाहणी करून राडारोडा हटवण्यास सुरुवात केली. त्यासाठी जेसीबी आणि दोन डंपरच्या साह्याने काम सुरू करण्यात आले आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक स्वाती पाटील व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळाची पाहणी केली. रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सिंहगड रस्त्याच्या पायथ्याशी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.जीवितहानी टळलीसुदैवाने यंदा हा प्रकार पहाटे घडल्याने कोणतीही जिवितहानी अथवा कोणी अडकून पडले नाही़ सायंकाळपर्यंत एखादे वाहन जाईल इतक्या रस्त्यावरील राडारोडा हटविण्यात आला आहे़ तरीही सुरक्षेच्या कारणास्तव रस्ता बंद ठेवण्यात आला असल्याचे वन विभागाने सांगितले़ रविवारी त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने हजारो पर्यटक सिंहगडावर येत असतात़ त्यांची चांगलीच निराशा झाली़ 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या