शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीमंत योगी’नाटयाविष्काराने सिंधू नृत्यमहोत्सवाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 20:20 IST

शास्त्रीय नृत्याचे वैभव, वैविध्य आणि नाविन्य रसिकांसमोर यावे या उद्देशाने प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक वैभव आरेकर व कथक नर्तक सुशांत जाधव यांच्या संकल्पनेतून शहरात सिंधू नृत्य महोत्सव होत आहे. ‘श्रीमंत योगी’ या नाट्याविष्काराने आज महोत्सवाला सुरुवात झाली.

ठळक मुद्देशिवाजी महाराज आणि त्या काळातील सांस्कृतिक, सामाजिक चित्र कलाकारांनी उभे केले. ‘बीप महाराज की जय’ या लघुनाट्याचे सादरीकरणही या महोत्सवात करण्यात आले.   

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा कर्मयोग, स्वराज्यारोहण, त्यांचा आंतरिक संघर्ष आणि त्या वेळची सामाजिक परिस्थिती? नाट्याविष्काराच्या माध्यमातून शनिवारी पुणेकरांनी अनुभवली..निमित्त होते सांख्य डान्स कंपनी आणि मुद्रा सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स यांच्या वतीने आयोजित सिंधू नृत्य महोत्सवातील ‘श्रीमंत योगी’ नाट्याविष्काराचे.      शास्त्रीय नृत्याचे वैभव, वैविध्य आणि नाविन्य रसिकांसमोर यावे या उद्देशाने प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक वैभव आरेकर व कथक नर्तक सुशांत जाधव यांच्या संकल्पनेतून शहरात सिंधू नृत्य महोत्सव होत आहे. स्वत: वैभव आरेकर यांनी साकारलेल्या ‘श्रीमंत योगी’ या नाट्याविष्काराने आज महोत्सवाला सुरुवात झाली.या नाट्याविष्कारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत अनेक गोष्टींचे सादरीकरण भरतनाट्यमच्या माध्यमातून उपस्थितांच्या समोर सादर करण्यात आले. यामध्ये मुख्यत: शिवाजी महाराज आणि त्या काळातील सांस्कृतिक, सामाजिक चित्र कलाकारांनी उभे केले. याबरोबरच शिवरायांच्या जन्माअगोदर राज्याची असलेली परिस्थिती, त्यांचा जन्म, स्वराज्याची शपथ, स्थापना, महाराजांचा राज्याभिषेक, त्यांचे सत्तारूढ होणे याबरोबरच त्यांचा आंतरिक व आध्यात्मिक संघर्ष या कलाकृतीत पाहायला मिळाला. मुख्यत: ‘कर्मयोगी’ शिवाजी महाराज दाखविण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला आहे. लयबद्ध सादरीकरण आणि उत्कृष्ट प्रकाशयोजना यांचा सुंदर मिलापाला रसिकांची भरभरुन दाद मिळाली.   याबरोबरच महेश वाळुंज यांच्या ‘बीप महाराज की जय’ या लघुनाट्याचे सादरीकरणही या महोत्सवात करण्यात आले.   

टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज