शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 00:26 IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट १३२वे वर्ष; एलईडी लाईट, झुंबर व दिव्यांनी उजळला रथ; हजारो भाविकांची उपस्थिती

पुणे: लाखो एलईडी दिव्यांनी उजळलेल्या श्री उमांगमलज रथात विराजमान होऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची वैभवशाली सांगता मिरवणूक बेलबाग चौकातून निघाली आणि तो क्षण अनुभवण्याकरीता हजारो गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. सलग दुसऱ्या वर्षी दुपारी ४ वाजता दगडूशेठचे गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी झाले. संपूर्ण रथावर लावण्यात आलेल्या एलईडी दिव्यांच्या रंगीबेरंगी रोषणाईने मिरवणुकीच्या वैभवात आणखी भर घातली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी आयोजित सांगता मिरवणुकीला मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास बेलबाग चौकातून प्रारंभ झाला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी यांसह हजारो कार्यकर्ते पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. बेलबाग चौकात आरती करुन मिरवणुकीला प्रारंभ झाला. स्वरुपवर्धिनी ढोल ताशा ध्वज पथक आणि झांज पथकातील वादकांनी गणरायाला पारंपरिक पद्धतीने दिलेली मानवंदना हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले

मिरवणुकीच्या अग्रभागी रुग्णसेवा रथ होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक विषयांतर्गत आरोग्य विषयक जनजागृती रथावरुन करण्यात आली. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-ताशा पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता. तसेच केरळमधील चेंदा वाद्याचे वादन कलाकारांनी केले. पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते.

लक्ष्मी रस्त्यावरुन बाप्पाची मिरवणूक जात असताना ठिकठिकाणी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने गणरायाला नमन करण्यात आले. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास टिळक चौकात रथाचे आगमन होताच हा क्षण डोळयात साठविण्यासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात रात्री ८. ४५ वाजता पांचाळेश्वर घाट येथे हौदात मूर्तीचे विसर्जन करुन गणरायाला निरोप देण्यात आला.

श्री उमांगमलज रथ पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी

यंदा उत्सवात साकारलेली प्रतिकृती जटोली शिवमंदिराच्या विषयानुरुप सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली. श्री उमांगमलज रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती होती. त्याच्या बाजूला त्रिशूळ आणि डमरु होते. कळस म्हणून मोठा रुद्राक्ष दाखविण्यात आला. नागाच्या फण्यावर हा तोललेला होता, बाजूला २१ छोटे कळस लावण्यात आले. तर, रथावर २३ नंदींचे चेहरे बसविण्यात आले. रथावर तब्बल १८ क्रिस्टलचे झुंबर लावण्यात आले होते.

याशिवाय रथावर ८ खांब साकारण्यात आले. प्रत्येक खांबावर बेलाच्या पानांचे डिझाईन साकारण्यात आले. रथावर एलईडी व पार लाईटचे फोकस लावण्यात आले. रथामध्ये बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होते, तेथे मोराची डिझाईन देखील साकारण्यात आली. त्यामुळे हा अतिशय विलोभलीय रथ व मिरवणूक सोहळा पाहण्यासोबतच अनेकांनी ते नेत्रदिपक क्षण आपल्या मोबाईल कॅमे-यामध्ये टिपले.

टॅग्स :Dagdusheth Templeदगडूशेठ मंदिरPuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024