शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची यंदाही अभिषेक सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 23:09 IST

भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या श्री गणेश अभिषेक सेवेला गेल्यावर्षी मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे यंदाही हा उपक्रम सुरु ठेवण्यात येणार आहे.

अभिषेकासाठी नाव नोंदणीस सुरुवात

पुणे : भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या श्री गणेश अभिषेक सेवेला गेल्यावर्षी मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे यंदाही हा उपक्रम सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार भाविकांना ऐच्छिक देणगीच्या माध्यमातून ही सेवा मिळणार असून त्यासाठी नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  गेल्या १३४ वर्षांपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचा उत्सव साजरा होतो. त्यानिमित्ताने ट्रस्टकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मात्र, उत्सवात श्री गणेशाची अभिषेक सेवा अद्यापपर्यंत सुरु करण्यात आली नव्हती. मात्र, गेल्या दोन तीन वर्षापासून भाविकांकडून अभिषेक सेवा सुरु करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात सुरु होती. भाविकांच्या या मागणीचा मान राखत अखेर ट्रस्टने गतवर्षीपासून अभिषेक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि हिच परंपरा यंदाही पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार दहा दिवसांच्या उत्सव कालावधीत पहाटे ५ ते ११ या वेळेत भाविकांना बाप्पाचा अभिषेक करता येणार आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे या श्री. गणेश अभिषेकासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क निश्चित करण्यात आलेले नसून भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार देणगी देऊन अभिषेक करता येणार असल्याची माहिती उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी दिली. त्यासाठी आधीच नाव नोंदणी करुन वेळ निश्चित करता येणार आहे.

ऐच्छिक अभिषेक करण्यासाठी भाविकांना http://bit.ly/abhishek2025 या लिंकवर जाऊन नाव नोंदणी करता येणार असून नाव नोंदणीसाठी काही अडचण असल्यास ९०४९२३३०२९ किंवा ९८९०९९४१८२ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय नाव नोंदणी करू न शकलेल्या भाविकांनाही अभिषेक करावयाचा असेल तर थेट उत्सव मंडपात नाव नोंदणी केलेल्या भाविकांचा अभिषेक झाल्यानंतर उपलब्ध वेळेनुसार अभिषेक करता येणार आहे.  त्यासाठी इच्छुक भाविकांनी सोबत दिलेल्या लिंकवर आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट'कडून करण्यात आले आहे....

"भाविकांच्या मागणीनुसार गतवर्षीपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची अभिषेक सेवा सुरु केली आणि या सेवेला गणेश भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाही ही 'ऐच्छिक अभिषेक सेवा' सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. यंदाही भाविकांकडून या सेवेचं स्वागत केलं जाईल आणि सेवेचा लाभही घेतला जाईल, असा विश्वास आहे."

- पुनीत बालनउत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2025Pune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सव