शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

श्रावण सोमवार : ज्योतिर्लिंग, ज्योतिबा देवाच्या उत्सव मूर्तींना नीरास्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:41 IST

काटेबारस यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री ज्योतिर्लिंग आणि श्री जोतिबा देवाच्या उत्सव मुर्तींना श्रावणा निमित्त नीरा नदीच्या पवित्र तिर्थात सोमवारी स्नान घालण्यात आले.

नीरा - काटेबारस यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री ज्योतिर्लिंग आणि श्री जोतिबा देवाच्या उत्सव मुर्तींना श्रावणा निमित्त नीरा नदीच्या पवित्र तिर्थात सोमवारी स्नान घालण्यात आले. तिर्थक्षेत्राचा  क  दर्जा असलेल्या गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग मंदिरात श्रावण महिन्यातील समोवारसह दररोज शिवपींडीवर अभिषेक करण्यात येणार आहे.कार्तिक महिन्यातील एकादशीला ज्योतिर्लिंग व जोतिबा देवाच्या मूर्तींना यात्रेनिमित्त व श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नीरा नदीच्या तीर्थात स्नान घालण्याची परंपरा आहे. त्यानंतर महिनाभर मंदिरातील शिवपिंडीला अभिषेक घालण्याची परंपरा आहे. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास कर्नलवाडीतील जोतिबा देवाच्या मुर्तीची आरती झाल्यावर उत्सव मुर्ती पालखीतून मंदिर प्रदक्षिणे नंतर फुलांनी सजवलेल्या रथात ठेवण्यात आल्या.१०.३० च्या गुळुंचेच्या ज्योतिलींग मंदिरात आरती झाल्यावर उत्सव मुर्तीची पालखीतून मिरवणूक काढून त्या रथात ठेवण्यात आल्या. नीरा नदीच्या पैलतीरावरील दत्तघाटावर उत्सव मुर्तींना भक्तिभावाने स्नान घालण्यात आले. या स्नान सोहळ्यासाठी युवकांसह ज्येष्ठांनी गर्दी केली होती. प्रत्येक भाविकाला स्वहस्ते स्नान घालण्याची संधी असल्याने शिवभक्त या संधिचा वर्षातून किमान एकदा तरी लाभ घेतात. स्नानानंतर मुर्ती पुन्हा पालखीत ठेवल्यावर आरती झाली. त्यानंतर वैशिष्ट पुर्ण असा गुळ शेंगदाण्याचा प्रसाद भावीक एकमेकांना देत होते. नीरा स्नानानंतर दुपारी पालखी नीरेतील प्रसिद्ध वालचंद शहा पेढीच्या समोर दर्शनासाठी ठेवली होती. यावेळी परिसरातील शिवभक्तांनी श्रद्धेने दोन्ही मुर्त्यांचे दर्शन घेतले. साडेतीनच्या सुमारास हा सोहळा गुळुंचे कडे मार्गस्थ झाला.श्रावण महिन्यातील सोमवारसह इतर दिवशी सकाळी ज्योतिर्लिंग मंदिरातील शिवपिंडीवर अभिषेक घालण्याची परंपरा आहे. युवकांसह जेष्ठ नागरिक श्रद्धेने अभिषेक घालतात. याचदरम्यान दर्शनासाठी इतर भाविक येतात त्यामुळे गर्दी होते. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. प्रत्येक शिवभक्ताला पिंडीवरच स्वहस्ते अभिषेक घालण्याची इच्छा असते. त्यामुळे यावर्षीपासून पूर्ण श्रावण महिन्यात दररोज सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत अभिषेक घातले जातील.- गोरखभाऊ निगडे, अध्यक्ष ज्योतिर्लिंग मंदिर जीर्णोद्धार कमिटी.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक