शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटमध्ये कांद्याचा तुटवडा, अपेक्षित नवीन आवक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 05:50 IST

यंदा राज्यात बहुतेक सर्वच भागांत परतीच्या पावसाने पिकांचे प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे अद्यापही नवीन हळवी कांद्याची अपेक्षित अशी आवक सुरू झाली नाही.

पुणे : यंदा राज्यात बहुतेक सर्वच भागांत परतीच्या पावसाने पिकांचे प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे अद्यापही नवीन हळवी कांद्याची अपेक्षित अशी आवक सुरू झाली नाही. जुन्या कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे मार्केट यार्डात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी मागील दोन दिवसांत घाऊक बाजारात कांद्याच्या भावात प्रतिकिलो ५ रुपयांनी वाढ झाली आहे. जुन्या आणि नवीन कांद्यास घाऊक बाजारात अनुक्रमे प्रतिकिलोस २८ ते ३५ आणि २० ते ३० रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात जुन्या कांद्याची ४० ते ६० रुपये, नवीन कांद्याची ३० ते ४० रुपये भावाने विक्री होत आहे.मार्केट यार्डातील कांदा विभागात मागील आठवड्यात दररोज १५० ट्रक कांद्याची आवक होत होती. त्यामध्ये केवळ १० ते १५ ट्रक नवीन हळवी कांद्याचा समावेश असायचा. ही आवक अपेक्षेपेक्षा कमी आहे. सध्या बाजारात पुणे जिल्हा आणि श्रीगोंदा परिसरातून नवीन कांद्याची आवक होत आहे. परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याने आणखी १५ ते २० दिवस ही आवक वाढण्याची शक्यता नाही. तर दुसरीकडे जुन्या कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.

टॅग्स :onionकांदाPuneपुणे