शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

‘शोले’चा शेवटही झाला होता ‘सेन्सॉर’; रमेश सिप्पी यांचा ‘पिफ’मध्ये गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 16:40 IST

हात नसलेला ठाकूर पायाने गब्बरला कसा काय मारू शकतो? असा प्रश्न उपस्थित करीत ‘शोले’ चित्रपटाचा शेवट बदलायला भाग पाडले, असा गौप्यस्फोट करीत दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ‘सेन्सॉर’ ही खूप मोठी समस्या आहे’ अशा शब्दांत सेन्सॉर बोर्डावर टीका केली.

ठळक मुद्देसेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरूद्ध दिग्दर्शक नक्कीच लढा देऊ शकतात : रमेश सिप्पी''‘पॅशन'’ हा चित्रपट निर्मितीचा महत्त्वपूर्ण घटक'

पुणे :  ‘शोले’ चित्रपटाचा शेवट एका वेगळ्या दृष्टीकोनातून केला होता. सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पाहिल्यानंतर खूपच हिंसा दाखविण्यात आली आहे. हात नसलेला ठाकूर पायाने गब्बरला कसा काय मारू शकतो? असा प्रश्न उपस्थित करीत चित्रपटाचा शेवट बदलायला भाग पाडले. त्यांनी सूचविलेल्या शेवटाने आम्ही फारसे आनंदी नव्हतो.. पण आम्हाला ते करावे लागले...असा गौप्यस्फोट करीत ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी करीत ‘सेन्सॉर’ ही खूप मोठी समस्या आहे’ अशा शब्दांत सेन्सॉर बोर्डावर टीका केली.पिफमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पिफ फोरममधील राज कपूर पॅव्हेलियन मंचाचे उद्घाटन रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर तसेच रमेश सिप्पी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पिफचे संयोजक डॉ. जब्बार पटेल यांनी सिप्पी यांची मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते. भारतीय चित्रपटसृष्टीत ‘शोले’ या चित्रपटाने इतिहास रचत रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. आजही या चित्रपटाचे रसिकमनावर गारूड कायम आहे. ‘अरे ओ सांबा कितने आदमी थे, ये हाथ मुझे दे दे ठाकूर’ हे गब्बरचे संवाद त्याच अमजद खान यांच्या खर्ज्यातील आवाजात सादर करीत शोलेची आठवण ताजी केली. सलीम-जावेद यांनी लिहिलेले गब्बरच्या तोंडचे संवाद पाहिले तर खूप साधे आहेत पण त्याला काहीसा उत्तर प्रदेशीय भाषा आणि लय यामुळे हे संवाद खूपच प्रभावी वाटले आहेत. कथानक, वातावरण, ड्रामा याला कुठेही धक्का न लावताही दिग्दर्शकाला अनेक वेगळे प्रयोग चित्रपटामधून करता येऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे  ‘शोले’. जे प्रेक्षकांनी पूर्वी कधी पाहिले नाही ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु एका वेगळ्या दृष्टीकोनातून बनविलेल्या चित्रपटाचा शेवट बदलला जाणे ही दिग्दर्शकासाठी निराशेची गोष्ट असते. त्याचा सामना मला करावा लागला आहे. त्यामुळे सेन्सॉरशीप लादली जाण्याची बाब काही नवीन नाही. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरूद्ध दिग्दर्शक नक्कीच लढा देऊ शकतात. मात्र एक गोष्ट नक्कीच आहे की चित्रपटातून हिंसेचे उदात्तीकरण करण्यात आलेले सगळेच चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरतातच असेही नाही. पण दिग्दर्शकाने आपले काम चोखपणे करीत राहाणे हाच त्यावरचा उत्तम पर्याय आहे, असा सल्ला त्यांनी नवोदित दिग्दर्शकांना दिला. मला चित्रपट बनविण्याची कधीच भीती वाटत नाही. दिग्दर्शकाला चित्रपटामधून जे मांडायचे आहे ते त्याने मांडले पाहिजे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ‘पॅशन’ हा चित्रपट निर्मितीचा महत्त्वपूर्ण घटक आहे. मी स्वत: चित्रपट बनविण्याचे रितसर प्रशिक्षण घेतलेले नाही. लहानपणी वडिलांच्या चित्रपट सेटवर जायचो. पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टी, लाईटस, कॅमेरा, अभिनय या सर्व गोष्टा जवळून अनुभवल्या. याच वातावरणात लहानाचा मोठा झालो. पॅशन असल्याशिवाय चित्रपट निर्मितीचा भाग होता येणे शक्य नाही. त्याकाळाच्या तुलनेत आज नवीन पिढीला चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या घटकांचे प्रशिक्षण घेण्याची अनेक व्यासपीठ खुली झाली आहेत. चित्रपट म्हणजे कथानक सांगण्याचा प्रकार असतो. ते कथानक प्रेक्षकांना कसे भावेल त्यासाठी त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा वापर करता येईल तो कसा घडविता येईल या गोष्टींचे आकलन प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहजसोप्या पद्धतीने होऊ शकते असे सांगत प्रशिक्षण महत्वपूर्ण असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

टॅग्स :PIFFपीफJabbar Patelजब्बार पटेल Puneपुणे