शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

धक्कादायक ! बनावट सही ठाेका, पुणे महापालिकेची तिजाेरी लुटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 12:33 IST

अधिकाऱ्यांनी दिवसाढवळ्या संगनमताने मारला पाच काेटींचा डल्ला

दीपक मुनोत- 

पुणे: महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये अदा करण्यात आल्याचा गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांसह काही वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने हा गैरप्रकार झाल्याची चर्चा आहे.

पुणे महापालिकेच्या मलनि:सारण  प्रकल्प या विभागामध्ये हा घोटाळा झाला आहे. या विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता संदीप खांदवे हे ३१ ऑगस्ट २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा पदभार, कार्यकारी अभियंता सुश्मिता शिर्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात आला. त्यानंतर सुमारे तीन महिन्यानंतर २७ नोव्हेंबर २०१९ रोजी, अधिकाऱ्यांनी संगनमताने खांदवे यांचीच हूबेहूब बनावट स्वाक्षरी करून ʻपाटील कन्सट्रक्शन ॲंड  इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडʼ या ठेकेदाराला, ४ कोटी ८८ लाख २४ हजार ५०५ रूपयांचे बिल परस्पर अदा करून टाकले. दरम्यान, खांडवे यांनी ʻतीʼ सही आपण केली नसल्याचे ʻलोकमतʼ बरोबर बोलताना स्पष्ट केले आहे.मलनि:सारण विभागाच्या प्रकल्प विभागाने, संबंधित ठेकेदाराला शहरात ठिकठिकाणी मलवाहिन्या टाकण्याचे ५६ कोटी ५७ लाखाचे कंत्राट २०१७ साली दिले आहे. त्यानूसार, शहरातील सुमारे ५१ किलोमीटर लांबीच्या नदीनाल्यांमध्ये ३६ ठिकाणी उघड्यावर वाहणारे मैलापाणी हे बंदिस्त नलिकांद्वारे जवळच्या मैलापाणी शुध्दीकरण केंद्रापर्यंत वाहून नेण्यात येणार आहे. या कंत्राटातील, बारावे रनिंग बिल काढताना हा मोठा घोटाळा झाला आहे.

महापालिकेच्या, मलनि:सारण विभागाचा प्रकल्प विभाग, मुख्य लेखा परीक्षक कार्यालयासह  अन्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी इतकी मोठी रक्कम अदा करताना अगदी प्राथमिक निकषही न पाळता हेतूत: दुर्लक्ष केल्याचे, प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. परिणामी संगनमताने पालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकल्याच्या चर्चेला पुष्टी मिळत आहे.

एरवी, ठेकेदार हा काम पुर्ण झाल्यानंतर फार फार तर पंधरवड्यात मोबदल्याचे बिल सादर करतो आणि पैसे वसूल करतो. मात्र हे वादग्रस्त प्रकरण त्यास अपवाद ठरले आहे. संबंधित काम हे जानेवारी २०१९ मध्येच पुर्ण झाले असे बिलावर ʻकागदोपत्रीʼ दर्शवण्यात आले आहे. प्रत्यक्षात बिल हे पंधरवडा- महिनाभरात नव्हे तर तब्बल दहा महिने विलंबाने सादर करण्यात आले. एरवी, बिल वसुलीसाठी घाईगर्दी केली जात असताना कनिष्ठ, उप अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी खांदवे यांच्या निवृती पर्यंतची वाट पाहिली, ही बाब देखील गैरप्रकार झाल्याच्या संशयाला पुष्टी देणारी आहे.बोगस आणि कागदोपत्री कामांच्या बिलांना थारा न देणाऱ्या खांदवे यांच्या सेवानिवृत्तीनंतर मात्र त्यांच्याच सहकाऱ्यांनी ʻडावʼ साधला, आणि बनावट सही करून करदात्यांच्या कोट्यवधी रूपयांवर डल्ला मारला आहे.................................... ʻत्याʼ बिलावर मी सही केलेली नाही. महापालिकेच्या प्रदीर्घ सेवेत मी अत्यंत जबाबदारीने काम केले आहे. सेवानिवृत्तीनंतर तर अशी सही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.- संदीप खांडवे, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता..................... नेमके काय झाले आहे त्याचा तपास सोमवारी करते. - उल्का कळसकर, मुख्य लेखापाल, पुणे महापालिका...................हे धक्कादायक आहे..या प्रकरणाची तातडीने चौकशी करतो. - सुरेश जगताप, अतिरिक्त महापालिका आयुक्त.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfraudधोकेबाजीcommissionerआयुक्तMayorमहापौर