शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! बोपदेव घाटात फेकला जातोय शहरातल्या हॉस्पिटलमधला 'मेडिकल वेस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 13:34 IST

ओढ्याच्या पाण्यात पीपीई किट, इतर साहित्यांचा खच

ठळक मुद्देबोपदेव घाट रस्त्यात अनेक ठिकाणी वैद्यकीय कचरा टाकलेला आढळलामहापालिकेकडून की हॉस्पिटलमधून कचरा फेकून दिला जात आहे याचा शोध घेण्याची आवश्यकता

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल कचरा वाढला असून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याऐवजी शहराच्या आजू बाजूला तो टाकून दिला जात असल्याचे आढळून येत आहे. सासवडहून पुण्याकडे येणाऱ्या बोपदेव घाटात अनेक ठिकाणी असे वैद्यकीय साहित्य रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी टाकून दिल्याचे आढळून आले आहे.       कोरोना संसर्गामुळे सध्या वैद्यकीय कचरा वाढला आहे़ होम असोलिशन झालेल्या लोकांचा वैद्यकीय कचरा वेगळा गोळा करण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. पीपीई किट, इंजेक्शनच्या सुया, हातमोजे, मास्क याचा वापर वाढला असल्याने त्याचा कचराही मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे़. शहरालगतच्या वस्त्यांमध्ये आणि गावांमध्ये असा वैद्यकीय कचरा गोळा करण्याची कोणतीही व्यवस्था झालेली दिसत नाही.

त्याचबरोबर शहरातील कचरा हा बाहेर नेऊन टाकला जात असल्याचा संशय आहे. याबाबत लोकमत चे वाचक देवेंद्र कुमार ठक्कर हे सासवडहून दुचाकीवरुन पुण्याकडे येत होते. त्यावेळी बोपदेव घाट उतरल्यानंतर रस्त्याकडेच्या ओढ्याजवळ थांबले असताना त्यांना ओढ्यात पीपीई किट व इतर वैद्यकीय साहित्य टाकून दिलेले आढळून आले. ओढ्याच्या पाण्यात हे साहित्या टाकून दिल्याने पुढे हे पाणी वाहत जाऊन ज्या ठिकाणी हे मिळते त्या ठिकाणी पाणी प्रदुषित होण्याचा धोका आहे.       याबाबत ठक्कर यांनी सांगितले की, बोपदेव घाट रस्त्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वैद्यकीय कचरा टाकलेला आढळून येत आहे. त्यात वापरलेले पीपीई कीट, गोळ्यांचे बॉक्स, इंजेक्शनच्या सुया, तसेच इतर वैद्यकीय साहित्य दिसत आहे. हा वैद्यकीय कचरा टाकून पर्यावरणाचा व्हास केला जात आहे. 
शहरालगतच्या बाहेर अशा प्रकारे अनेक ठिकाणी वैद्यकीय कचरा टाकून दिलेला वेळोवेळी आढळून आला आहे. हा वैद्यकीय कचरा नेमका कोणी टाकला, महापालिकेच्या वतीने हॉस्पिटलमधून वैद्यकीय कचरा वेगळ्या वाहनांमार्फत गोळा केला जातो. मग महापालिकेच्या वाहनांमधून हा कचरा आडबाजूला जाऊन फेकून दिला जात आहे का? की हॉस्पिटलमधून हा कचरा फेकला जात आहे याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :PuneपुणेMedicalवैद्यकीयcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल