शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रुग्णालयातील परिचारिकेनेच केला रेमडेसिविरचा काळा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 18:37 IST

चढ्या भावाने इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणी परिचारिकेसह एकाला अटक

ठळक मुद्देरेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या दहा पथकांची नेमणूक

पुणे: शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना काळ्या बाजारात चढ्या भावाने इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणी एका खासगी रूग्णालयातील कोरोना उपचार केंद्रातील परिचारिकेसह एकाला अटक करण्यात आली आहे.  गुन्हे शाखा आणि औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) ही कारवाई करण्यात आली. 

पृथ्वीराज संदीप मुळीक (वय २२, रा. दत्तनगर) आणि नीलिमा किसन घोडेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडेकर या हिंजवडीतील एका खासगी रूग्णालयात परिचारिकेचे काम करतात. एफडीएतील निरीक्षक अतिश सरकाळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांना कात्रज येथील दत्तनगर परिसरात एकजण जादा भावाने रेमडेसिविरची विक्री जादा भावाने करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी  सापळा रचून मुळीकला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. मुळीक दत्तनगरमधील साईप्रसाद कोविड सेंटरमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली. त्याने हिंजवडीतील एका खासगी रूग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या घोडेकर या आपल्या मैत्रिणीकडून रेमडेसिविरइंजेक्शन घेतल्याची माहिती दिली. याप्रकरणी मुळीक आणि त्याची परिचारिका मैत्रीण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रमुख तसेच गुन्हे शाखेच्या दहा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. इंजेक्शनची जादा भावाने विक्री होत असल्यास त्वरीत पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल