शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

शिवसृष्टी की मेट्रो? काय ते ठरवा!

By admin | Updated: November 3, 2015 03:38 IST

कोथरूड येथील जुन्या कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन आणि शिवसृष्टी असे दोन प्रस्ताव पाठवल्यामुळे राज्य सरकारने पालिकेला दोन्हीपैकी नक्की काय करायचे त्याचा निर्णय घेण्याबाबत

पुणे : कोथरूड येथील जुन्या कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन आणि शिवसृष्टी असे दोन प्रस्ताव पाठवल्यामुळे राज्य सरकारने पालिकेला दोन्हीपैकी नक्की काय करायचे त्याचा निर्णय घेण्याबाबत पत्र पाठवले आहे. मेट्रोच्या प्रस्तावाबाबत केंद्र व राज्यस्तरावर जोरदार हालचाली सुरू असल्यामुळे पालिकेला लवकरच याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.यासंदर्भात बोलताना महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले, की हे दोन्ही प्रकल्प शहरासाठी महत्त्वाचे आहेत व ते दोन्ही व्हावेत अशीच महापालिकेची इच्छा आहे. सन २०१० मध्ये पालिकेने राज्य सरकारला नियोजित शिवसृष्टीचा प्रस्ताव पाठवला होता. कोथरूड येथील जुन्या कचरा डेपोचा रिकामा असलेला भूखंड यासाठी निश्चित केला होता. त्यानंतर काही वर्षांनी मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव तयार झाला. त्यात मेट्रो स्टेशनसाठीही हीच जागा निश्चित झाली. त्याचाही प्रस्ताव राज्य सरकारकडे गेला, त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.उपमहापौर आबा बागुल, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, राजेंद्र वागस्कर, किशोर शिंदे, अशोक हरणावळ, सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक दीपक मानकर, जयश्री मारणे, ओमप्रकाश बकोरिया, शहर अभियंता प्रशांत वाघमारे व अन्य काही वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.प्रकल्प महत्त्वाचा, पैसे उभे करूसलग ५ वर्षांचा कालावधी लागणाऱ्या या प्रकल्पासाठी काही कोटी रुपये लागणार आहेत. जकात, एलबीटी बंद यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे प्रशासनाकडून सतत सांगण्यात येते. असे असताना या प्रकल्पासाठी इतका खर्च कसा करणार, असे विचारले असता महापौर धनकवडे यांनी, ही शिवसृष्टी आहे, त्यासाठी कधीही पैसे कमी पडणार नाहीत असे सांगितले. साधारण साडेतीन वर्षांनंतर प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करता येईल, असा देसाई यांचा अंदाज आहे. यातून पुण्याला एक वेगळी ओळख मिळणार आहे. महाराजांचे बालपण पुण्यात गेले, त्यांचे नित्यस्मरण देणारा हा प्रकल्प पुण्यात होणे यात वेगळेच औचित्य आहे, त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी प्रकल्प होईलच, असा निर्धार महापौरांनी व्यक्त केला.