शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

आमदार शरद सोनवणेंच्या विरोधात शिवसैनिकांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 01:09 IST

महाराष्ट्रातील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांना जुन्नर विधानसभेकरिता शिवसेना पक्षात प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

नारायणगाव : महाराष्ट्रातील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांना जुन्नर विधानसभेकरिता शिवसेना पक्षात प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. जर पक्षाने शिवसैनिकांची भुमिका ऐकून न घेता सोनवणे यांना उमेदवारी दिल्यास जुन्नर तालुक्यातील सर्व शिवसैनिक आपल्या पदाचे तसेच तालुक्यातील पंचायत समिती सभापती, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती सदस्य व इतर पदावर कार्यरत असलेले सदस्य आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा नारायणगाव येथे झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.शिवसैनिकांनी आमदार शरद सोनवणे यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध दर्शविला असून, बाहेरचा उमेदवार शिवसैनिक स्वीकारणार नाहीत अशी भूमिका स्पष्ट करीत तालुक्यातील सर्व पदाधिकारी लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भुमिका स्पष्ट करणार आहेत. निवडणुकीपुर्वी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांना जुन्नर विधानसभेची उमेदवारी जाहीर करावी, अन्यथा लोकसभेचे काम न करण्याची भूमिका पदाधिकारी यांनी घेतल्याने जुन्नर तालुक्यात शिवसेनेमध्ये भगवे मोठे वादळ माजले आहे.नारायणगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर सोमवारी शिवसेना पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत सोनवणे यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध दर्शविण्यात आला. या बैठकीला शिवसेनेच्या जि.प. गटनेत्या आशा बुचके, जि.प. सदस्य गुलाब पारखे, तालुका समन्वय प्रसन्ना डोके, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, जिल्हा समन्वय संभाजी तांबे, बाजार समिती सदस्य आनंद रासकर, मंगेश काकडे, बाळासाहेब पाटे, सभापती ललिता चव्हाण, माजी सभापती संगीता वाघ, उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी, युवासेना जिल्हा प्रमुख गणेश कवडे, पं.स. सदस्य दिलीप गांजळे, अर्चना माळवदकर, रमेश खुडे, जीवन शिंदे, उपजिल्हा प्रमुख व विघ्नहरचे संचालक संतोषनाना खैरे, सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, उपसरपंच संतोष दांगट, युवा सेना उपतालुका प्रमुख अभिषेक वर्पे, विकी पारखी, आरीफ आतार, बाजीराव लाड, बब्बू भंडलकर यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.>शिवसेनेत आमदार शरद सोनवणे यांना घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसैनिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आ. सोनवणे यांनी सर्वच पक्षांकडून पोळी भाजून घेतलेली आहे. त्यांची कोणत्याही पक्षात एकनिष्ठ नाही. सन २००९ ला उमेदवारी देण्यावरून संघर्ष झाला नसता तर त्याच वेळी शिवसेनेचा आमदार असता. पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेचा उमेदवार जाहीर करावा, जर केला नाही तर जुन्नर तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिकारी जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल. - आशाताई बुचके.पक्षप्रमुखांनी शिवसैनिकांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये. सोनवणे हे शिवसेनेत येणार अशी संभ्रमावस्था शिवसैनिकांमध्ये आहे. जुन्नर तालुक्यात पंचायत समिती, नगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. विघ्नहर कारखाना व बाजार समितीमध्ये सेनेचाच सहभाग आहे. असे असताना शिवसैनिकांना विश्वासात न घेता ज्यांनी शिवसेनेला त्रास दिला अशा आ. सोनवणे यांना उमेदवारी दिली तर जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील. - प्रसन्न डोके