शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
2
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
3
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
4
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
6
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
7
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
8
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
9
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
10
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
11
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
12
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
13
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
14
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
15
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
16
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
17
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
18
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
19
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
20
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?

राज्य रयतेचे हा शिवरायांचा मूलमंत्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 1:39 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : सरकारी योजनांची माहिती देणाऱ्या महायोजना शिबिराचे उद््घाटन

पुणे : शिवाजी महाराजांनी राज्यकर्त्यांना राज्य रयतेचे आहे हा मूलमंत्र दिला. त्याचेच पालन केंद्र व राज्य सरकार करत आहे. वंचित, गरिबांना लाभ देणे हे सरकारचे काम आहे. त्यादृष्टीने समाजातील सर्व थरातील घटकांसाठी विविध योजना आणल्या, फक्त आणल्यात नाहीत तर त्या संबंधितांपर्यंत कशा पोहोचतील याची काळजी घेतली, असे मत व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे लोकसभा निवडणुकीचे रणशिंगच मंगळवारी फुंकले.

कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी महेश विद्यालय येथे आयोजित केलेल्या सरकारी योजनांची माहिती देणाºया महायोजना शिबिराचे उद््घाटन फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी झाले. पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते.

भौतिक विकासाकडेही सरकारचे लक्ष आहे, असे स्पष्ट करून फडणवीस म्हणाले, १५ वर्षे पुण्यात ज्या योजनांची फक्त चर्चाच सुरू होती, त्या योजना आम्ही प्रत्यक्षात आणल्या, त्यांच्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले, काम सुरू झाले. २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर अशी योजना आहे. राज्यात २०२१ मध्येच ही योजना पूर्ण होईल, असे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यासाठी अनेक योजना दिल्या आहेत. पुणे हे उत्तम शहर आहेच, ते सर्वोत्तम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या काही वर्षांतच पुण्याचा नवा चेहरा पाहायला मिळेल.मुख्यमंत्र्यांना पुढील कार्यक्रमाची घाई असल्यामुळे अन्य कोणाचेही भाषण घेण्यात आले नाही. आमदार कुलकर्णी यांनी प्रास्तविकात शिबिराची माहिती दिली. लाभार्थी घटकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला. अनेक लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची होती; मात्र ते लगेच निघून गेल्यामुळे त्यांची निराशा झाली.तक्रार करण्याचाही आम्हाला अधिकार नाही का?च्राज्य राखीव दलातून अपात्र म्हणून कमी केलेल्या अपर्णा धारिया यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांचे कडे भेदून व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यामुळे त्या भयंकर संतप्त झाल्या होत्या. अन्याय निवारण व्हावे यासाठी तक्रार करण्याचाही आम्हाला अधिकार नाही का, अशी विचारणा करत त्यांनी माध्यमांसमोर गाºहाणे गायले.४फडणवीस म्हणाले, सरकारी योजनांचा लाभ लवकर मिळत नाही असा समज होता. ज्यांच्यासाठी योजना आहेत, त्यांच्यापर्यंत त्या पोहोचतच नाही अशी स्थिती होती. आम्ही त्यात बदल केला. माहिती शिबिरे, समाधान शिबिरे आयोजित केली. हे शिबिर त्यापैकीच एक आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे