शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

सरकारविरोधात शिवनेरीवर शिवप्रेमींची घोषणाबाजी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 17:56 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज शिवनेरी किल्यावर जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवप्रेमींच्या मनातील सरकारविरोधी असंतोष उफाळून आल्याचे दिसून आले. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज शिवनेरी किल्यावर जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवप्रेमींच्या मनातील सरकारविरोधी असंतोष उफाळून आल्याचे दिसून आले. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निमित्त होते, ते म्हणजे दरवर्षी शिवनेरीवर शिवजयंती झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण होत असते. यंदा मात्र मुख्यमंत्र्यांनी भाषण केलंच नाही. मुख्यमंत्र्यांनी फक्त पाळणा जोजवला आणि निघून गेले. आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री 8.55 वाजता किल्ल्यावर येणार होते आणि 10.05 वाजता परत जाणार होते. मात्र 9.35 वाजताच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने शिवनेरीवरुन उड्डाण घेतलं. यामुळे शिवनेरी किल्यावरुन उतरताना विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना शिवप्रेमींच्या रोषाला तोंड द्यावे लागले. विनोद तावडे आणि पंकजा मुंडे शिवप्रेमींनी त्यांची अडवणूक करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विनोद तावडे काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. तर पंकजा मुंडे यांनी शिवप्रेमींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी होता. दरम्यान, घटनास्थळी गोंधळ वाढत गेला त्यामुळे विनोद तावडे यांनी मागच्या मागे काढता पाय घेतला. ते पाहून पंकजा मुंडेही त्या ठिकाणावरुन निघून गेल्या. मंत्र्यांनी काढता पाय घेतल्याचं पाहून शिवप्रेमींचा संताप आणखी अनावर झाला. त्यांनी ‘शिवाजी महाराज की जय’चा जयजयकार केला आणि सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.दरम्यान, यावर विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिल आहे की, मुंबईमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे त्यांना जास्त वेळ शिवनेरीवर थांबता आले नाही. राज्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे काम या कार्यक्रमाद्वारे होत आहे. तरीही मुख्यमंत्री महत्त्वाचा कार्यक्रम असल्याने शिवनेरीवर आले, असे त्यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Shivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८