पुणो : अरुंद खड्डेमय रस्ते, जागोजागी कच:याचे ढीग, पावसाळ्यात रस्त्यात तयार होणारी डबकी, तात्पुरती खडी टाकून दुरुस्ती करूनही रस्त्यांची सातत्याने होणारी दुरवस्था अशा बिकट परिस्थितीतून सध्या पुण्यालगत असलेल्या शिवणो गावातील नागरिकांना वाट काढावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
शिवणो परिसरात प्रवेश केल्यापासून देशमुख वाडी, उत्तमनगर, कोंढवे धावडेर्पयतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कागदोपत्री महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही शिवणो येथील नागरिकांना मूलभूत समस्यांचा अभावच पाहायला मिळत आहे. शासकीय विभागाच्या टोलवाटोलवीमध्ये वाहनचालक मात्र भरडले जात आहेत. या परिसरात औद्योगिकीकरण झपाटय़ाने वाढत आहे. तसेच नवनवीन इमारती, वसाहती उभ्या राहत असल्याने लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे या रस्त्याने मोठय़ा प्रमाणात वाहतूक सुरूअसते. परंतु, सध्या या मुख्य रस्त्यावर गुडघाभर खोल खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाणी साचून त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शिवणो, उत्तमनगर, कोंढवे धावडेतील मुख्य रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येतात. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी या विभागाची असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची डागडुजी केली जात आहे. या सर्व टोलवाटोलवीत स्थानिक रहिवाशांचे मात्र हाल होत आहेत. सध्याच्या वाहतुकीच्या मानाने हा रस्ता अतिशय अपुरा ठरत आहे.
या मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्टय़ा दीड ते दोन फुटांनी खचल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीस मोठी अडचण होत असून वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा वाहतूककोंडी होते.
तसेच वाहनचालकांना पाठीच्या, मणक्याच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. अरुंद रस्त्यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघातही झाले आहेत. (प्रतिनिधी)
4या परिसरातील केवळ मुख्य रस्ताच नव्हे तर अंतर्गत रस्त्यांची परिस्थितीही अतिशय बिकट आहे. अनधिकृत बांधकामे, दोन वसाहतींमधील पुरेशा जागेचा अभाव यामुळे अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूककोंडीस सामोरे जावे लागते. एका वेळी एकच चारचाकी जाऊ शकेल एवढय़ाच रुंदीचे रस्ते डोकेदुखी ठरत आहेत. स्थानिक ग्रामस्थांची अरेरावी, स्थानिक प्रशासनाची उदासिनता यामुळे रस्त्यांची कामे अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत.
शिवणो, उत्तमनगर, कोंढवे धावडे परिसरातील मुख्य रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारीही याच विभागामार्फत करण्यात येते. पावसाळ्यात या रस्त्याची दुरवस्था झाली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यावर खडी टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. ही कामे आमदार फंडातून केली जातात. रस्त्याच्या दुरुस्तीबाबतच्या सूचना ग्रामपंचायती मार्फत दिल्या जातात. मात्र, कार्यवाही त्या विभागामार्फतच केली जाते.
- पूजा गायकवाड, सरपंच, कोंढवे धावडे