शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

शिवशाही बसचा उड्डाणपुलावर मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 2:30 AM

धनकवडी - सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडी येथील  श्री सदगुरु शंकर महाराज उड्डाणपूलवर बालाजीनगर परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस गेले दोन दिवस बेवारस अवस्थेत उभी आहे. यामुळे उड्डाण पुलावरून सुरू असलेल्या वाहतूकीला एकीकडे अडथळा तर दुसरीकडे बसच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गेली दोन दिवस सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी ...

धनकवडी - सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडी येथील  श्री सदगुरु शंकर महाराज उड्डाणपूलवर बालाजीनगर परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस गेले दोन दिवस बेवारस अवस्थेत उभी आहे. यामुळे उड्डाण पुलावरून सुरू असलेल्या वाहतूकीला एकीकडे अडथळा तर दुसरीकडे बसच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गेली दोन दिवस सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा ठप्प झाली आसून मोठ्या प्रमाणात बस आगारात थांबून आहेत. संपामुळे प्रवास्यांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी खाजगी वाहनांचा पर्याय निवडला. दहावी चा निकाल , पुण्याच्या बाहेरून येणारा नोकर वर्ग , ज्येष्ठ नागरिक यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. त्याचवेळी उड्डाणपूलावर गेली दोन दिवस बंद असलेल्या बस कडे पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. बस मध्ये बिघाड झाल्यामुळे  त्याच ठिकाणी बस थांबून चालकाने प्रवाशांना खाली उतरून चालक निघून गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र चालकाने ती बस ब्रेकडाऊन सर्हीस च्या साह्याने बस आगारात नेण्या ऐवजी उड्डाणपूलावर उभी केली आहे. यामुळे स्वारगेट कडून सातारा कडे जाणा?्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.रात्रीच्या वेळी बसचा इंडिकेटर सुरू नसल्याने बस उभी आहे की धावत आहे याचा अनेकांना अंदाज येत नसल्याने धोकादायक स्थिती निर्माण होत आहे. दरम्यान स्वारगेट आगार व्यवस्थापक यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.सातारा रस्ता उड्डाणपूलावर उभी असलेली शिवशाही बस पाहून आश्चर्य वाटत आहे. मोठ्या प्रमाणात आणि वेगाने होत असलेल्या वाहतूक मार्गावर बस गेली दोन दिवस उभी आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- हेंमत डावळकर 

टॅग्स :ST Strikeएसटी संपShivshahiशिवशाहीPuneपुणे