शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिवारे भातकाढणीसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 23:07 IST

भीमाशंकर, पाटण, आहुपे खोरे : हळव्या जातीच्या भाताचे पीक सर्वाधिक प्रमाणात

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यांमध्ये हळव्या जातीच्या भातकाढणीसाठी भातशिवारे सज्ज झाली असून, आदिवासी शेतकºयांची लगबग सुरू आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी व हा परिसर भातशेतीची आगार समजली जातात. पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते. सध्या या खोºयांमध्ये भातशिवारे भातरोपे काढण्यासाठी सज्ज झाली आहेत. गतवर्षापेक्षा यंदा वरुणराजाने लवकरच काढता पाय घेतल्याने हळव्या जातीच्या भातकाढणीसाठी वेग आला आहे.

आदिवासीबांधव हा प्रत्येक वर्षी रोहिणी व मृग नक्षत्राच्या काझ्यांमध्ये हा शुभमुहूर्त समजून धूळवाफेत पेरण्या करीत असतो. आदिवासीबांधवांनी या रोहिणी व मृग नक्षत्रांच्या काझ्यांमध्ये काही ठिकाणी धूळवाफेत, तर काही ठिकाणी चीडवाफेत पेरण्या उरकून घेतल्या. गतवर्षापेक्षा चालूवर्षी रोहिणी, मृग नक्षत्रांपाठोपाठ आर्द्रा व पुनर्वसू (कोर) या नक्षत्रांतही सुरुवातीपासूनच पावसाने चांगली साथ दिल्याने भातपेरणी केलेला वरचा दाणा व मातीआड गेलेला दाणा उतरून येऊन भातरोपे चांगल्या प्रकारे तरारू लागल्या. आदिवासी शेतकºयांनी लागवडी उरकून घेतल्यानंतर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी भातरोपे सडून गेली, तर काही ठिकाणी बांध फुटून भातखाचरे गाडली गेली.यानंतर दाट धुके व रोगट वातावरणामुळे या भातपिकांवर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे अत्यंत कडक पडणाºया उन्हामुळे भातपीक जळून गेले आहे. सध्या भातशिवारे ही भातकाढणीसाठी सज्ज झाली आहेत. तोच मागील पाच-सहा दिवसांपूर्वी पाऊस पडल्यामुळे भात भिजला. मोठ्या आशेने काबाडकष्ट करून पेरलेले पीक निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.४सध्या भीमाशंकर, आहुपे व पाटण खोºयामध्ये हळव्या पिकांच्या जातीमध्ये ढवळा, तांबकुड, कोळंबा, रायभोग या पिकांची काढण्यासाठी लगबग सुरू आहे. इंद्रायणी खडक्या आंबेमोहर, तांबडा, रायभोग या जातीची पिके काडात ओली असल्यामुळे पुढील आठवड्यापासून या जातीची पिके काढण्यात येणार असल्याचे आदिवासी शेतकºयांनी सांगितले. गºया जातींमध्ये जिर लहान खडक्या आंबेमोहर आदी जाती हिरव्या असल्यामुळे यांच्या काढणीला उशीरच होईल.४चालूवर्षी भातपिकाला पाऊस योग्य वेळी न आल्याने त्याचप्रमाणे करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे भातपीक हे मोठ्या प्रमाणात संकटात सापडले आहे. यामुळे पळंज व पाकुड मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे भातपिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी