शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

"आढळराव पाटलांच्या पक्षबदलाने शिवसेनेची हानी होईल..." डॉ. नीलम गोऱ्हेंनी अखेर मौन सोडले

By निलेश राऊत | Updated: April 5, 2024 17:13 IST

सध्या आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार कामाला लागलो आहोत

पुणे: एखाद्या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्या पक्षाची हानी ही होतच असते. शिवाजीराव आढळराव हे शिवसेना सोडून गेले त्यामुळे शिवसेनेची हानी होईल. असे प्रतिपादन करून, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आढळराव हे ताटातून वाटीत गेले असल्याची टिप्पणी केली.     पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लोकसभा जागा वाटपमध्ये महायुतीत प्रत्येकाच्या आशा पूर्ण होतील असे नसते. युतीमध्ये यापूर्वी ही तडजोडी झाल्या आहेत. महायुतीच्या पक्ष प्रमुखांकडून याबाबत अंतिम निर्णय घेतील. सध्या आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार कामाला लागलो आहोत. भाजपने आमचे उमेदवार बदलले असे पर्सेप्शन तयार केले आहे, पण अशा प्रकारे गैरसमज पसरवणे योग्य नाही. यापूर्वीही पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी दिली गेली आहे. होती. महायुती ही एकत्र काम करण्यासाठी केलेले समीकरण असते. त्याला अंतिम स्वरुप येण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे आधीपासून असे आडाखे बांधणे योग्य नाही. आमच्याकडे अजून कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे आरोप केले नाहीत. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

पुण्यातील लढत दुहेरीच

वंचित कडून वसंत मोरे पुणेलोकसभा निवडणुकीत उतरल्याने पुण्यातील लढत तिरंगी होणार असे बोलले जात आहे. यावर बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी, गेल्या काही निवडणुकीतील अनुभव पाहता वंचितचा पहिल्या पहिल्यांदा जोर असतो. पण मतदानावेळी तो कमी होतो. त्यामुळे पुण्याची निवडणुक ही मोहोळ व धंगेकर अशी दुहेरीच होईल असे सांगितले. दरम्यान अजित पवार यांचे पूर्ण जिल्ह्यातील काम पाहता बारामती मध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी बारामती लोकसभा मतदार संघात मेळावे घेतले आहेत, जिथं जिथं माझी गरज असेल, तिथं तिथं मी प्रचाराला जाईल असेही त्यांनी सांगितले. छत्रपती असले तरी ते लोकशाहीचे छत्रपती आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे आपल्याला आणि छत्रपती यांना मतदानाच्या एकच अधिकार आहे. तिकीट न मिळाल्याने  उदयन राजे यांचा सन्मान कमी होईल असे समजण्याचे कारण नसल्याचे ही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेNeelam gorheनीलम गो-हेShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणshirur-pcशिरूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४