शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे पुरंदर तालुका प्रमुख दिलीप यादव यांचे श्रीनाथ पतसंस्थेतील गैरकारभारामुळे पद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 21:04 IST

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ व त्याखालील नियम ५८ मधील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली

सासवड : शिवसेनेचे पुरंदर तालुका प्रमुख व जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप सोपानराव यादव यांच्या श्रीनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैर कारभारामुळे संस्थेचे अध्यक्ष दिलीप सोपानराव यादव यांचे अध्यक्षपद आणि सदस्यपद पद रिक्त झाल्याची घोषणा अप्पर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, डॉ पी एल खंडागळे यांनी केली आहे.  महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ व त्याखालील नियम ५८ मधील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दिलीप यादव यांनी त्यांचे सख्खे बंधू शिवाजी सोपानराव यादव यांची परिंचे येथील ग्रामपंचायत मिळकत क्रमांक ९७२ असलेल्या अनधिकृत बांधकामातील व्यापारी गाळे वाजवी किमतीपेक्षा जास्त किमतीने खरेदी करून संस्थेचे आर्थिक नुकसान केलेले आहे. याबाबत दिलीप यादव यांचे दुसरे सख्खे बंधू व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे सख्खे मेहुणे बाळासाहेब सोपानराव यादव व निलेश आनंदराव यादव या सभासदांनी दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी मा अप्पर निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे पुराव्यानिशी लेखी तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने मा अप्पर निबंधक यांच्यासमोर याबाबत सुनावण्या झाल्या. यावेळी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर मा अप्पर निबंधक यांनी दि २२ एप्रिल २०२२ रोजी आदेश पारित करून त्यामध्ये पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक पद रिक्त केल्याची घोषणा केली आहे. 

 याबाबत तक्रार बाळासाहेब सोपानराव यादव व निलेश आनंदराव यादव यांनी, श्रीनाथ कृपा पतसंस्थेमध्ये अनेक प्रकारचे बोगस कर्ज वाटप केल्याच्या तक्रारी मा अप्पर निबंधक यांच्याकडे पुराव्यानिशी दाखल केल्या आहेत. त्याअनुषंगाने चाचणी लेखापरीक्षण व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ अन्वये चौकशीचे आदेश पारित झाले होते. त्याबाबतही मंत्रालयीन स्तरावर व मा उच्च न्यायालयात खटले प्रलंबित आहेत., असे सांगितले. दरम्यान या आदेशामुळे सभासद व ठेवीदारांत संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :PurandarपुरंदरShiv SenaशिवसेनाSocialसामाजिकElectionनिवडणूक