शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीचा घटक पक्ष 'शिवसंग्राम' लोकसभेच्या तीन तर विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही

By राजू हिंगे | Updated: January 16, 2024 20:09 IST

भारतीय जनता पक्षाकडून महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो सन्मान मिळेल. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील

पुणे : महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसंग्राम पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत तीन, तर विधानसभा निवडणुकीत बारा जागांसाठी आग्रही आहे, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी  दिली. आगामी काळातील निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आणि संघटन बांधणीसाठी शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश राज्यस्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर पार पडले.  त्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. 

यावेळी शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे, शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे, प्रदेश सचिव शेखर पवार, हिंदुराव जाधव, ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, खजिनदार रामनाथ जगदाळे, पुणे शहराध्यक्ष भरत लगड, कालिंदी गोडांबे, चेतन भालेकर, विनोद शिंदे, लहू ओहोळ, भरत फाटक, सागर फाटक आदी उपस्थित होते. तानाजी शिंदे म्हणाले, "महायुतीमध्ये शिवसंग्राम हा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष आहे. गेल्यावेळी शिवसंग्राम पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र या वेळेला शिवसंग्रामने लोकसभेच्या तीन जागांवर तयारी सुरू केलेली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्षाचे गेल्यावेळी दोन आमदार निवडून आले होते. या वेळेला शिवसंग्राम पक्ष विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही आहे. भारतीय जनता पक्षाकडून महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो सन्मान मिळेल. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, असा विश्वास आहे."

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असून त्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळायला हवे  

"मेटे साहेबांच्या नेतृत्वात मराठा आंदोलन झाले होते. तेव्हा आरक्षणदेखील मिळाले होते. आताही मराठा आरक्षणासाठी शिवसंग्राम पक्षाची तीच भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आंदोलनात आम्ही पाठीशी आहोत. छगन भुजबळ यांच्या भूमिकेबाबत त्यांचा पक्ष निर्णय घेईल. पण ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळायला हवे. सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही शिवस्मारक अडकलेले आहे.  शिवस्मारक लवकरात लवकर उभारण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

डॉ. ज्योती मेटे म्हणाल्या, "शिवसंग्राम संघटना ही आपल्यासारख्या मावळ्यांच्या जीवावर पुढे वाटचाल करणार आहे. शिवसंग्राम संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु शिवसंग्राम कधीही संपणार नाही.  येणाऱ्या काळात आपल्याला संघर्ष करावा लागेल.

टॅग्स :Puneपुणेlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण