शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन केंद्र ४० वरून १९ वर, पाच महिन्यांपासून अनुदानही रखडले

By नितीन चौधरी | Updated: December 3, 2024 09:02 IST

गरिबांना मिळणारी स्वस्तातील थाळी दुरापास्त होत असल्याचे चित्र आहे.

पुणे : जिल्ह्यात कोरोना काळात अनेकांना क्षुधातृप्तीसाठी आधार देणाऱ्या शिवभोजन केंद्रांची संख्या ४० इतकी होती. मात्र, अवेळी मिळणारे अनुदान, नागरिकांचा न मिळणारा प्रतिसाद यामुळे गेल्या पावणेदोन वर्षांत जिल्ह्यातील तब्बल २१ केंद्रे बंद झाली आहेत. जिल्ह्यातील ११ तालुक्यांत असलेले ४० शिवभोजन केंद्रे सध्या केवळ ७ तालुक्यांमध्येच १९ इतकेच उरले आहेत. या केंद्रांना गेल्या पाच महिन्यांपासून अनुदानही मिळाले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गरिबांना मिळणारी स्वस्तातील थाळी दुरापास्त होत असल्याचे चित्र आहे. राज्यातील गरीब व गरजू लोकांना दहा रुपयांत भोजन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारतर्फे शिवभोजन थाळीची योजना चालविली जाते. ही योजना महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाली होती. २०२३च्या मार्चअखेर जिल्ह्यात अशी ४० केंद्र सुरू होती. मात्र, राज्य सरकारकडून अनुदान वेळेत न मिळत असल्याने केंद्रचालकांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. परिणामी, अनेक चालकांनी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या नोव्हेंबरअखेर जिल्ह्यात केवळ १९ केंद्रे सुरू असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे. अनुदानाव्यतिरिक्त विकलेल्या थाळ्यांचा हिशेब ठेवणे, सीसीटीव्ही लावणे, त्याची पडताळणी तहसीलदारांकडून होणे अशा जिकरीच्या अटी तसेच नागरिकांचा अल्प प्रतिसादही केंद्र बंद होण्यामागील कारण आहे.जिल्हा पुरवठा विभागाने २३ जूनपर्यंत शिवभोजन केंद्रांना अनुदान वितरित केले आहे. यासाठी राज्य सरकारकडून एकूण २ कोटी ८२ हजार ५१ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. संबंधित तहसीलदारांकडून सप्टेंबरपर्यंतचे शिवभोजन प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, या कालावधीचे अनुदान शिवभोजन केंद्रचालकांना चार-पाच दिवसांत वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. परिणामी, या १९ केंद्रचालकांना गेल्या पाच महिन्यांचे अनुदान मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.दहा रुपयांत काय मिळते?दहा रुपयांच्या या शिवभोजन थाळीत २ चपात्या, एक वाटी भाजी, १ मूद भात व एक वाटी वरण दिले जाते.केंद्रांना मिळते २५ आणि ४० रुपयांचे अनुदानया केंद्रांना राज्य सरकारकडून प्रतिथाळी अनुदान दिले जाते. त्यात ग्रामीण भागातील केंद्रांसाठी २५ रुपये तर शहरी भागासाठी ४० रुपयांचे अनुदान दिले जाते.जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रबारामती ४हवेली ६पुरंदर ३आंबेगाव १दौंड २मावळ १खेड २एकूण १९ 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकारMahayutiमहायुती