शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरकर दररोज रिचवतात २५ हजार लिटर दारू! संजय पाचंगे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:45 IST

शिरूर तालुक्यात ९३ ग्रामपंचायतींनी संपूर्ण दारूबंदीचे ठराव करूनही तालुक्यात दररोज तब्बल २५ हजार लिटर दारूविक्री होत असल्याचा दावाही क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : तालुक्यात ९३ ग्रामपंचायतींनी संपूर्ण दारूबंदीचे ठराव करूनही तालुक्यात दररोज तब्बल २५ हजार लिटर दारूविक्री होत असल्याचा दावाही क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केला असून तालुक्यातील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध दारूधंद्यांवर कारवाईच होत नाही. याच्या निषेधार्थ तसेच कारवाई न करणाºया संबंधित विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पाचंगे १२ डिसेंबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे पाचंगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.पाचंगे यांनी ९ आॅगस्ट २०१६ पासून तालुक्यात दारूबंदी अभियान सुरू केले आहे. त्यांच्या या अभियानाला प्रतिसाद म्हणून १५ आॅगस्ट २०१६ ला तालुक्यातील ९३ ग्रामसभेत दारूबंदीचे ठराव करण्यात आले. ६० हजार नागरिकांनी दारूबंदी अभियानाच्या समर्थनार्थ स्वाक्षºया केल्या. मात्र याबाबत उत्पादन शुल्क तसेच तालुक्यातील प्रशासनाने कारवाई केली नाही, असा आरोप पाचंगे यांनी केला. ते म्हणाले, तालुक्यात शिरूर रांजणगाव व शिक्रापूर या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५० अवैध हॉटेल्स, ढाबे व टपºयांतून बाटलीबंद दारूची अवैधरित्या विक्री होते. २०० पेक्षा जास्त गावठी दारूचे अड्डे आहेत. २५० ढाबे, हॉटेल्समधून सर्रासपणे विक्री केली जाणारी दारू ही बनावट असून या बनावट दारूचे रॅकेट असून तालुक्यातील एक राजकीय व्यक्ती याचा मास्टर माइंड आहे.या रॅकेटमध्ये उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी, निवृत्त अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय व्यक्ती सामील असून याबाबतची माहिती काही पोलीस अधिकाºयांकडूनच मिळाल्याचे पाचंगे यांनी सांगितले. या बनावटदारूच्या रॅकेटची प्रचंड दहशतअसून कारवाई कराल तर याद राखा, अशी धमकी पोलीस अधिकाºयांनाच मिळत आहे. वरिष्ठांकडूनच या रॅकेटवर अजिबात कारवाई न करण्याचा आदेश पोलिसांना मिळत आहे. यामुळे पोलीस कारवाईची हिम्मत करीत नाहीत.पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी‘दारूबंदी’चे आंदोलन थांबव नाहीतर नाशिकच्या अधिका-याला जाळले तसे पेट्रोल टाकून जाळू, अशी धमकी ६ डिसेंबर रोजी पाच अनोळखी व्यक्तींनी दिल्याचे सांगितले.६ डिसेंबरला पाचंगे शिक्रापूरहून शिरूरला येत असताना कासारी फाट्याजवळ ते काही कामानिमित्त थांबले असता दोन काळ्या रंगाच्या दुचाकीवरून पाचजण त्यांच्याजवळ आले.एकाने शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तर दुसºयाने थेट जाळून मारण्याची धमकी दिल्याचे पाचंगे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे