शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

शिरूर स्मशानभूमीचा परिसर दिव्यांनी उजळला, युवा स्पंदन व युवा वाद्य पथकाच्या युवकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 2:18 AM

दीपावलीत आंगण, मंदिरे, घरे दीपोत्सवाने उजळून निघतात. मात्र अंतिम संस्काराच्या प्रसंगाव्यतिरिक्त क्वचितच ज्या ठिकाणी कोणी फिरकत नसावे असा स्मशानभूमीचा (अमरधाम) परिसर दिव्यांनी उजळून टाकला.

शिरूर : दीपावलीत आंगण, मंदिरे, घरे दीपोत्सवाने उजळून निघतात. मात्र अंतिम संस्काराच्या प्रसंगाव्यतिरिक्त क्वचितच ज्या ठिकाणी कोणी फिरकत नसावे असा स्मशानभूमीचा (अमरधाम) परिसर दिव्यांनी उजळून टाकला.युवा स्पंदन व युवा वाद्य पथकाच्या युवकांनी एक आगळा-वेगला दीपोत्सव साजरा केला. ज्या ठिकाणी रात्री येण्यास लोक घाबरतात त्या ठिकाणी या युवकांनी भीती व अंधश्रद्धा बाजूला ठेवून एक चांगला संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न केला. लक्ष लक्ष दिव्यांच्या दीपावली सणात दिव्यांचा उत्सव सर्वत्रच पाहायला मिळतो. मात्र प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा शेवटचा प्रवास जिथे संपतो त्या स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा करण्याची कल्पना मनात येणे ही निश्चितच कात्ौुकास्पद गोष्ट म्हणावी लागेल. या भागात रात्रीच काय पण दिवसा येण्यासही कोणास आवडत नाही. यातच भूतप्रेत याबाबत आजही अंधश्रद्धा मनात आहेच. स्मशानभूमीच हा भागही आपल्या जीवनातला महत्त्वाचा भाग आहे. याची जाणीवच करून देण्यासाठी तसेच अंधश्रद्धा दूर करण्याच्या हेतूने युवा स्पंदनच्या युवकांनी मागील वर्षापासून स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला.नगराध्यक्षा वैशाली वाखारे, जिल्हा परिषद सदस्य कोमल वाखारे यांच्या हस्ते दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली. लोकजागृतीचे संस्थापक रवींद्र धनक, नगरसेवक विठ्ठल पवार, अभिजित पाचर्णे, संदीप गायकवाड, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, अ‍ॅड. सीमा काशीकर, अनुपमा दोशी, राणी चोरे, तृप्ती लामखडे आदी या वेळी उपस्थित होते. युवा स्पंदनचे प्रमुख धोत्रे, प्रियांका धोत्रे, अजिंक्य महाजन, प्रतिमा काशीकर, मानसी ढवळे, प्रवीण मापारी, कुणाल काळे, सचिन जाधव, प्रतीक काशीकर, यश जैन, पुष्पक नितनवरे, अथर्व वीरशैैव, हृषीकेश कडेकर, प्रतिभा उनवणे, ज्योती डोळस, दिव्या कोठारी, संजय भोस, नाना उजवणे आदी युवा स्पंदनच्या युवक, युवतींनी या दीपोत्सवाचे आयोजन केले.गंगारामचा वाखारेंच्या हस्ते सत्कारस्मशानजोगी म्हणून काम करणाºया गंगाराम जाधव याचा यावेळी जि.प. सदस्या कोमल वाखारे यांच्या हस्ते रोख रक्कम व मिठाई देऊन सत्कार केला.उपस्थित नगरसेवकांनी गंगारामला रोख रक्कम भेट दिली. माझ्या संपूर्ण आयुष्यात प्रथमच स्मशानभूमी दिव्यांनी उजळलेली पाहिल्याची भावुक प्रतिक्रिया या वेळी गंगारामने दिली.

टॅग्स :diwaliदिवाळी