शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

कारण-राजकारण : भाजप-राष्ट्रवादीच्या टकरीत शहरातील शिंदेसेना घायाळ

By श्रीनिवास नागे | Updated: June 4, 2025 14:44 IST

महापालिका निवडणुकीआधीच पक्ष बेदखल : सत्तेत असूनही खासदारांची निष्क्रियता, पक्षाचे कमी होणारे वलय, नेते-कार्यकर्त्यांची वानवा आणि पक्षसंघटन कार्यास बसलेली खीळ यांचा परिणाम

श्रीनिवास नागे

पिंपरी : सत्तेत असूनही खासदारांची निष्क्रियता, पक्षाचे कमी होणारे वलय, नेते-कार्यकर्त्यांची वानवा आणि पक्षसंघटन कार्यास बसलेली खीळ यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) निष्प्रभ झाली आहे. महायुतीत तर ती बेदखल आहे. त्यातच महापालिकेवरील वर्चस्वासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत टकरी सुरू आहेत, मात्र घायाळ होण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे.

महापालिका निवडणुकांचे नगारे वाजू लागले आहेत. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाइं एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत अनिश्चितता आहे. पिंपरी-चिंचवड शहरात भाजप आणि राष्ट्रवादीची स्वबळाची चाचपणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत मात्र सन्नाटा आहे. तीनवेळा निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे पक्षबांधणीत पूर्णत: अपयशी ठरले आहेत. त्यांच्या निष्क्रियतेमुळे पक्ष निष्प्रभ झाला आहे. खरेतर बारणे तिसऱ्यांदा खासदार झाले, तेच मुळी मोदी कार्डच्या बळावर. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमुळे त्यांना खासदारकीचा गुलाल लागला. विरोधातील उमेदवार कच्चा निघाल्याने त्यांचे फावले.

विजयात त्यांचे कर्तृत्व नगण्यच. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी ते रायगडमधील पनवेल-उरणपर्यंत पसरलेल्या लोकसभा मतदारसंघात त्यांचे स्वत:चे कार्यकर्ते हाताच्या बोटावर मोजूनही सापडणार नाहीत. त्यांनी शिवसैनिकांना बळ दिले नसल्यामुळे पक्षवाढ झाली नाही. भाजप-राष्ट्रवादीच्या तुलनेमध्ये शिवसेनेत इतर पक्षातून आलेल्यांची संख्या तशी तुटपुंजीच. तीही एकनाथ शिंदे सत्तेत असल्यामुळे. परिणामी विधानसभा निवडणुकीत शहर आणि परिसरातील एकही जागा शिंदेसेनेला महायुतीकडे मागता आली नाही. नंतर शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून उपमुख्यमंत्र्यांच्या आसनावर येताच पक्षाकडे येणाऱ्यांचा ओघ आणखी आटला. परिणामी पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असणारे खासदार असूनही येथे शिवसेनेची वाढ खुंटलेलीच राहिली.

अशा ताकदीवर शिवसेनेला महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवणे शक्य नाही. भाजप-राष्ट्रवादीच्या वळचणीला गेले, तरच काही जागा पदरात पडू शकतात. मागील म्हणजे २०१७ मधील महापालिका निवडणुकीत नगरसेवकांच्या १२८ जागा होत्या. मात्र शिवसेना एकसंध असतानाही केवळ नऊ जागा निवडून आल्या होत्या. खासदार बारणे यांची मर्यादा उघड झाली होती. आता शिवसेना फुटली आहे. त्यामुळे आधीच कमकुवत असलेल्या शिंदेसेनेला ‘हात दाखवून अवलक्षण नको’ म्हणत भाजप-राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जावे लागणार आहे. त्यातच भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या टकरी सुरू झाल्या आहेत, पण त्यामुळे महायुतीकडे आशेने डोळे लावून बसलेल्या शिंदेसेनेला आतल्या आत घायाळ व्हावे लागत आहे. अजित पवार जुळवून घेतील का?

राष्ट्रवादीचा निर्णय अजित पवार घेणार आहेत. पवार आणि बारणे यांच्यात सख्य नाही. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत बारणे यांनी पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव केला होता. ती सल पवारांना आहे. त्यानंतर २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत पवार यांनी बारणेंना हात दिल्याचे सांगितले जात असले तरी, सत्य गुलदस्त्यातच आहे. शिवाय शहरात राष्ट्रवादी मजबूत करून महापालिका पुन्हा ताब्यात घ्यायचे इरादे पवारांनी स्पष्ट केले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेला विशेषत: बारणे गटाला कितपत सोबत घेणार, हा प्रश्न आहे.

झाकली मूठ सव्वालाखाचीपिंपरी-चिंचवड शहरात भाजपमधील जगताप गटही मजबूत आहे. हा गट बारणेंचा पारंपरिक विरोधक आहे. मात्र मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बारणे आणि जगताप गटातील राजकीय वैर वरवर तरी कमी झाले आहे. मात्र महापालिका निवडणुकीत जगताप गटाला पर्यायाने भाजपलाही स्वबळ तपासून पाहण्याची संधी आली आहे. स्थानिक पातळीवर गटातटाचे राजकारण चालते. बारणे यांचा थोडाफार प्रभाव असलेल्या प्रभागात जगताप गटही प्रबळ आहे. परिणामी शिंदेसेनेला महायुतीत जाऊन पदरात पडतील तेवढ्या जागा घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. अर्थात झाकली मूठ सव्वालाखाची!

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूक 2024Muncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र