शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

शिधापत्रिकाधारकांची शिजेना डाळ, दिवाळीपासून वितरण विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 02:20 IST

गेल्या दोन ते पाच महिन्यांपासून शिधापत्रिकाधारकांना रास्त धान्य दुकानातून तूर, उडीद आणि हरभरा डाळ उपलब्ध होत नाही. झाली तर ती केवळ आवश्यकतेच्या ४0 टक्केच उपलब्ध होत आहेत.

पुणे  - गेल्या दोन ते पाच महिन्यांपासून शिधापत्रिकाधारकांना रास्त धान्य दुकानातून तूर, उडीद आणि हरभरा डाळ उपलब्ध होत नाही. झाली तर ती केवळ आवश्यकतेच्या ४0 टक्केच उपलब्ध होत आहेत. गेल्या दोन महिन्यांत तर डाळ उपलब्ध करून दिली नसल्याची माहिती हाती आली आहे. याप्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी(एफडीओ) कोणतेही उत्तर न देणेच पसंत केले.फेब्रुवारीअखेरीस शहरात २ लाख ६० हजार ३८३ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यावर ११ लाख ८ हजार ६६४ सदस्यांची नोंद आहे.राज्य सरकारने शिधापत्रिकेमागे प्रत्येकी एक किलो तूर, हरभरा आणि उडीदडाळ देण्याची घोषणा केली होती.मात्र, डाळींच्या वितरणामध्ये दिवाळीपासून अनियमितता असल्याचे रास्त धान्य दुकानदारांनी ‘लोकमत’शी बोलतानासांगितले.झोनमधील एक शिधापत्रिका दुकानदार म्हणाला, उडीद, तूर आणि चणा डाळ देण्याची घोषणा केली आहे. मात्र, कार्डसंख्येनुसार धान्य मिळत नाही. माझ्या दुकानात सहाशे कार्ड असतील, तर प्रत्येकी सहाशे किलो डाळ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, ती आवश्यकतेच्या चाळीस टक्केच मिळते. त्यामुळे कोणाला तूर, कोणाला उडीदडाळ द्यावी लागते. आता तर दोन महिन्यांपासून पैसे भरूनही डाळ उपलब्ध झालेली नाही.झोनमधील रास्त धान्य दुकानदार म्हणाले, की गेले दोन महिने डाळ मिळालेली नाही. तूरडाळ अगदी दिवाळीपासूनच मिळालेली नाही. अनेकदा डाळींचा दर्जादेखील चांगला नसतो. केवळ बाजारभावापेक्षा किंमत कमी असल्याने अनेक नागरिक डाळींची विचारणा करतात. मात्र, डाळ पाहून ती विकत घेत नाहीत.उत्तर मिळेना...याप्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकारी स्मिता मोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. एसएमएसद्वारे त्यांना विचारणा केली असता, त्यावर उत्तर मिळाले नाही.

टॅग्स :Puneपुणे