शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळ समाजाने जमीनमोजणी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 05:48 IST

जेजुरी औद्योगिक वसाहत टप्पा क्र. ५ च्या विस्तारीकरणासाठी शासनाने नावळी, कोळविहीरे व मावडी येथील शेतीवर दि. १३ एप्रिल २०११ रोजी आरक्षण टाकले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना धनगर समाजातील शेकडो महिला, पुरुष व तरुणांनी रोखले.

जेजुरी - जेजुरी औद्योगिक वसाहत टप्पा क्र. ५ च्या विस्तारीकरणासाठी शासनाने नावळी, कोळविहीरे व मावडी येथील शेतीवर दि. १३ एप्रिल २०११ रोजी आरक्षण टाकले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना धनगर समाजातील शेकडो महिला, पुरुष व तरुणांनी रोखले. ‘आमच्या जमिनी विस्तारीकरणासाठी द्यायच्या नाहीत. आम्ही त्या देणार नाही,’ अशा घोषणा देत त्यांनी अधिकाºयांना मोजणी करण्यास मज्जाव केला. सुमारे ६५१ एकर मेंढपाळ समाजाची शेतजमीन न मोजण्याचा शासकीय अधिकाºयांना निर्णय घ्यावा लागला. या वेळी येत्या १५ दिवसांत मुंबई येथे अथवा याच ठिकाणी अधिकारी व बाधित शेतकºयांची बैठक घेऊन अधिकृत निर्णय घेण्याचे ठरले.पुरंदर तालुक्यातील नावळी येथील १०६६.४० हेक्टर क्षेत्रावर शासनाने औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी आरक्षण टाकले आहे. समाजबांधवांचा मोठा विरोध आहे. त्यांचा विरोध झुगारून गुरुवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पोलीस अधिकारी, ५० पोलीस कर्मचारी, एक दंगल प्रतिबंधक तुकडी यांच्यासह एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संतोष देशमुख, भूसंपादन क्र. २२चे उपजिल्हाधिकारी गाडे, प्रांताधिकारी संजय असवले, तहसीलदार सचिन गिरी तसेच मोजणी कर्मचाºयांसह जमिनीची मोजणी करण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, मोजणीसाठी अधिकारी मोठ्या बंदोबस्तात येणार असल्याने येथील बाधित शेतकरी तसेच एमआयडीसी विस्तारीकरणाला विरोध करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकºयांचा आक्रमकपणा पाहून अधिकाºयांनी त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला.या वेळी बाधित शेतकºयांच्या वतीने जयराम थोरवे, धनंजय थोरवे, पुना रामा महानवर, रवा महादू थोरवे, मावडीचे माजी सरपंच चंद्रकांत भामे, प्रकाश भामे, भाजपाचे जिल्हा चिटणीस राजेंद्र जगताप, युवा मोर्चाचे अविनाश वाईकर, प्रसाद अत्रे यांनी शेतकºयांची बाजू मांडली. बैठकीत, येत्या १५ दिवसांत राज्याचे या विभागाचे सचिव, तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह बैठक घेऊन यावर निर्णय घेण्याचे ठरले.आज धनंजय पुनाजी महानवर, महेंद्र दादासाहेब थोरवे, सुमीत लालसाहेब महानवर यांनी उपोषण सुरू केले आहे. या वेळी शेतकरी जयराम तोरवे, बाळू तोरवे, रावा तोरवे, पुना महानवर, राजू तोरवे, धनंजय तोरवे, भिका कारंडे, सुनील कारंडे, मुक्ता थोरवे, हौसाबाई थोरवे, कलावती महानवर, शकुंतला दौंड, राधाबाई करंडी आदी उपस्थित होते़या जमिनीचे भूसंपादन झाल्यास या शेतकºयांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. जमिनी बागायती असूनही शासन त्या संपादित का करते, हेच आम्हाला समजत नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही. ज्यांना जमिनी द्यायच्या आहेत त्यांच्या जरूर घ्या, आम्ही विरोध करणार नाही. शासनाने जबरदस्ती केली तर आम्ही आत्महत्या करू; मात्र जमीन संपादित करू देणार नसल्याचे जयराम थोरवे, पुना रामा महानवर व शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे