शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

राम कृष्ण हरी! श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण; देहूत नयनरम्य रंगला सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 22:33 IST

पालखीला मेंढ्यांचे रिंगण सोहळा पार पडल्याने वारीतील परंपरा जपल्याचे वारकऱ्यांना समाधान...

देहूगाव : श्री संत तुकाराम महारांजाच्या पालखीला देहूगाव येथील मंदिराच्या आवारात मेंढ्यांचे रिंगण घातले आणि वारीतील आपली परंपरा कायम ठेवली. यंदा श्री संत तुकाराम महाराजांची पायीवारीसाठी पालखी सोहळा कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द झाला. पायीवारी सोहळ्यास शासनाने मर्यादित वारकऱ्यांमध्ये हा सोहळा पार पाडण्यास परवानगी दिली. त्यानुसार 1 जुलैला 350 लोकांमध्ये पालखी प्रस्थान सोहळा पार पडला.

त्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका मंदिरातील भजनी मंडपात ठेवून वारीतील नित्यनियमाचे कार्यक्रम व पूजा पाठ केले जात आहेत. पायीवारीत आज पालखी बारामती येथील मुक्कामानंतर काटेवाडी येथे दुपारच्या विश्रांतीसाठी थांबली असती. या ठिकाणी वारीतील परंपरेप्रमाणे धनगर समाजाच्या वतीने मेंढ्यांचे रिंगण घातले जात असते. त्यानुसार आज मंदिराच्या आवारात लालू सयाजी ढेकळे, दशरथ आनंदा ठेकळे, भिमराव पोपट ढेकळे व बाळु बबन शिंगटे हे देहूपरिसरात मेंढपाळ करणाऱ्या धनगरांनी आपल्या मेंढ्या मंदिरात पालखी प्रदक्षिणा घालण्यासाठी आणल्या होत्या. 

परंपरेनुसार पालखीला मेंढ्यांचे रिंगण सोहळा पार पडल्याने वारीतील परंपरा जपल्याचे समाधान या सोहळ्यात सहभागी झालेल्य़ा वारकऱ्यांना झाले होते. प्रथमच या भागात मेंढ्या चारण्यासाठी चंदनापूरी येथून येत असतात. हे सर्व मेंढपाळ देहूपरिसरात राहून आपल्या मेंढ्या सांभाळतात. त्यांना प्रथमच असा प्रकारचा पालखीला मेंढ्यांचे रिंगण घालण्याचा सन्मान मिळाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसांडून वाहत होते. मंदिरात पहाटे काकडारती झाली. त्यानंतर नित्यनियमानुसार विठ्ठल रुख्मिणी मंदिर, शिळा मंदिर, पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराज समाधी व वैंकुठगमन मंदिरात महापूजा झाल्या. सकाळी भजनी मंडपात भजन झाले. त्यानंतर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पालखी मंदिराच्या आवारात प्रदक्षिणेसाठी बाहेर काढण्यात आल्या.

यावेळी या मेंढ्यांनी पालखीला प्रदक्षिणा घालुन वारीतील परंपरा कायम ठेवत रिंगण सोहळा पार पाडला. उद्या रविवार (ता. 10) रोजी बेलवडीचा प्रतिकात्मक गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे. यासाठी मंदिरातील नियमित वारकऱ्यांमध्येच हा सोहळा पार पडणार आहे. भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर मात्र बंदच असणार आहे.    

टॅग्स :dehuदेहूPandharpur Wariपंढरपूर वारीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाcorona virusकोरोना वायरस बातम्या