शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरी डोंगरावर भाविकांसाठी विश्रांती शेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 00:59 IST

जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षाकाठी येथे आठ मोठ्या यात्रा आणि दर रविवारी देवदर्शनासाठी आणि कुलधर्म कुलाचारासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात

जेजुरी : कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या कडेपठार मंदिराकडे जाणाऱ्या डोंगराच्या पायरी मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी जेजुरी शहर बाराबलुतेदार संघाच्या वतीने विश्रांती ओटे आणि शेड उभारण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सचिन खोमणे यांनी दिली.

जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षाकाठी येथे आठ मोठ्या यात्रा आणि दर रविवारी देवदर्शनासाठी आणि कुलधर्म कुलाचारासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. खंडोबा देवाचे मूळस्थान जुनागड कडेपठारावर आहे. जुने मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार पाचशे फूट उंचीवर आहे. तसेच जेजुरीतील खंडोबा मंदिरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतर डोंगर चढून भाविकांना कडेपठार मंदिरात जावे लागते. हा कडेपठार डोंगर चढताना भाविकांची मोठी दमछाक होते. त्यामुळे बाराबलुतेदार संघाने या पायरीमार्गावर सहा ठिकाणी ओटे बांधण्यात आले आहेत. तर तीन ठिकाणी विश्रांतीओट्याबरोबरच शेड बांधण्यात आले आहेत. बाराबलुतेदार संघाचे अध्यक्ष सचिन खोमणे, पदाधिकारी तुषार कुंभार, किरण राऊत, रामभाऊ जाधव, विजय दरेकर, रामदास राऊत, प्रसाद अत्रे, सुरेश दोडके, चिमाजी दोडके,अजिंक्य बारभाई, मंगेश झगडे, माणिक पवार, दिलीप गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी या कामासाठी पुढाकार घेतला.पाण्याची व्यवस्था करणारकडेपठार डोंगर चढून जाताना ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी कडेपठार देवसंस्थानकडे मागणी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाण्याची पूर्तता न झाल्यास लोकसहभागातून पाण्याची टाकी बांधून प्रत्येक विश्रांती शेडजवळ नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय बाराबलुतेदार संघाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सचिन खोमणे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरी