शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या प्रवासात दोन तरूणींनीच केलं "ती " चं बसमध्ये बाळंतपण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 21:13 IST

बसमधेच सिटवर महिलेला झोपुन दोन्ही तरुण रणरागिणींनी या महिलेची प्रसुती केली.

ठळक मुद्देप्रवास करणारी गर्भवती महिला मरणयातना भोगत असताना पळुन गेला चालक

संजय बारहाते-    शिरूर : रात्रीचे बारा वाजलेलं.. बस बंद पडलेली..काळा कुट्ट अंधार दाटलेला.. अशावेळेस बसमधे एका महिलेला असाह्य प्रसृती वेदना सुरू होतात. मदत मिळत नाही मात्र त्या प्रवाशांमधील दोन रणरागिणी पुढे सरसावतात व त्या महिलेची सुखरूप प्रसुती करत तिचा व बाळाचा जीव वाचवितात . ही हृदय हेलवणारी घटना घडली पुणे नगर महामार्गावरती सुपा गावाजवळ .     रविवारी (दि.१६) सायंकाळी ८ वाजता संगम ट्रॅव्हल्सचा बस ( एमएच १९ वाय.६१२७  ही गाडी निगडी भोसरी मार्ग अकोला या जिल्हयासाठी निघाली होती.सव्वा सहाची बस आठला निघाली होती . त्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले होते . याच गाडीमधे भोसरी परिसरात राहणारी यशोदा विलास पवार ही गर्भवती महिला लोणार येथे गावी जाण्यासाठी निघाली होती . गाडी नगरच्या दिशेने धाऊ लागली होती . बस खड्ड्यात गेली की आदळत होती . त्यामुळे यशोदा यांना त्रास होऊ लागला. शिरूरपर्यंत तिच्याकडे कुणी लक्ष दिले नाही . शिरूर ओलांडून पुढे बस धावत होती. तश्या त्या वेदनेने घायाळ होत होत्या . अचानक सव्वा बाराच्या दरम्यान सुपा ( ता. पारनेर ) टोल नाक्याजवळ गाडी रस्त्यांतच बंद पडली . प्रवाशी खाली उतरले. मात्र , ही महिला गाडीतच जीवघेण्या वेदना सहन करीत होती  . सोबत कुणीही ओळखीचे नातेवाईक नव्हते . तिला प्रचंड कळा सुरू होत्या. गाडीत अंधार झाला होता . तिच्या मदतीला कोणी येईना. मात्र त्याच बसमधील प्रवाशी असलेल्या पुण्यावरून अकोला येथे निघालेल्या सोनाली दिलीप कावडे पुढे सरसावल्या. त्या महिलेला धीर  देऊ लागल्या. त्यांच्या मदतीला पुनम रामदास राऊत ( पातुर ) ही तरुणी मदतीला धावल्या बसमधेच सिटवर महिलेला झोपुन दोन्ही तरुण रणरागिणींनी या महिलेची प्रसुती केली . तिला मुलगी झाली . या दोन रणरागिणीमुळे महिला व बाळाचे प्राण वाचले हे मात्र खरे. त्यानंतर डॉक्टराशी संपर्क साधण्यात आला येथील डॉक्टर विलास काळे यांनी येऊन बाळाची नाळ कापली व दोघांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले . आई व मुलगी दोघेही सुखरूप आहेत. मात्र त्या दोघी माई लेकीसाठी खऱ्या अर्थाने सोनाली व पुनम देवदूत ठरल्या आहेत .या घडामोडी रात्रभर घडत होत्या. बस बंद पडल्याने चालक पळुन गेले. प्रवाशी रात्रभर थंडीत कुडकुड करीत होते . सोनाली यांनी बस मालकाशी संपर्क साधला. मात्र त्यांनी कोणतीही मदत दिली नाही  रात्री सव्वा बारा वाजता थांबलेले प्रवाशी सकाळी साडे दहा वाजता दुसरी बस आल्यानंतर अकोल्याकडे रवाना झाली .मात्र या दोन रणरागिनीच्या कार्याला डॉक्टरसह प्रवाशांनी सलाम केला .   ................खासगी बस संगम ट्रॅव्हल्समधुन प्रवास करणारी गर्भवती महिला मरणयातना भोगत असताना चालक पळुन गेला मालकानी फोन बंद केला. ही घटना क्रुर असुन खासगी ट्रॅव्हल्सवाले प्रवाशी महिलेच्या जीवाशी खेळत असुन त्यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे यांनी केली आहे.

आम्ही आमचं कर्तव्य पार पाडले.पवार माय लेकीना जीवदान देणाऱ्या सोनाली कवाडे व पुनम राऊत म्हणाल्या की, एक बहीण व बाळाचा जीव वाचऊन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडले . मात्र खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीमुळे आम्हाला रात्रभर थंडीत कुडकुडत राहावं लागते. तब्बल दहा तास रस्त्यावर प्रवाशी थांबले. मात्र, ट्रॅव्हल्स कंपनीकडुन कोणतीही मदत झाली नाही. एवढी माणुसकी हरवलीय का असा सवाल या रणरागिनीनी केला आहे. 

टॅग्स :Puneपुणेpregnant womanगर्भवती महिला