शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

‘ती’ बनली तरुणींची रोल मॉडेल; व्यवसायातून घेतली यशस्वी भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 2:48 PM

काश्मिरमधील एका तरूणीने हटके मार्ग पत्करला, तो व्यवसायाचा! वर्षभरातच तिच्या व्यवसायाने यशस्वी भरारी घेतल्याने तिच्याकडे पाहून इतर तरूणींच्या आशाही पल्लवित झाल्या असून, ती तरूणींची ‘रोल मॉडेल’ बनली आहे. 

ठळक मुद्देलहानपणापासूनच सामाजिक कार्य करण्याची इच्छा होती : निदा खान'काश्मिरमधील मुलींना माझ्याकडे पाहून प्रेरणा मिळाली पाहिजे, म्हणून एक पाऊल पुढे'

पुणे : काश्मिरमधील काही भागात अशांतता आहे. शिक्षित असूनही सरकारी नोकरी हा एकमेव पर्याय असल्याने सरसकट सगळ्यांच्याच हाताला काम मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे बेरोजगारीच अधिक आहे. कामासाठी तरूणांना बाहेरच्या गावचा रस्ता धरणे सहज शक्य आहे. मात्र तरूणींना घरातच अडकून पडावे लागत आहे. तरूणींकडे कला खूप आहेत, पण कलागुणांना व्यासपीठ मिळत नाही. अशा परिस्थितीत तेथील एका तरूणीने हटके मार्ग पत्करला, तो व्यवसायाचा! वर्षभरातच तिच्या व्यवसायाने यशस्वी भरारी घेतल्याने ‘हम भी कुछ कर सकते है’, हा आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला. तिच्या यशाकडे पाहून इतर तरूणींच्या आशाही पल्लवित झाल्या असून, ती तरूणींची ‘रोल मॉडेल’ बनली आहे. काश्मिर मधील बांदीपोर गावात राहणारी निदा खान पुण्यात आली असता तिने ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. काश्मिरमधील वातावरण.. तिला व्यवसायासाठी मिळालेली प्रेरणा आणि इतरांसाठी बनलेली रोल मॉडेल असा प्रवास तिने कथन केला. एकेकाळी काश्मिरची प्रतिमा जगाच्या पटलावर नंदनवन अशी होती, मात्र काश्मिरचा काही प्रांत दहशतीच्या छायेखाली असल्याने तिथे अशांततेचे वातावरण आहे. बेरोजगारीमुळे अनेक तरूण चुकीच्या मार्गाकडे वळू लागले आहेत. काश्मिरमधल्या तरूणींना शिक्षण झाल्यानंतर काम करणे मुश्किल असल्याने घरातच त्यांचा कोंडमारा होतो आहे. तरूणींमध्ये कला खूप आहेत. पण त्यांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहून काहीतरी वेगळे करुन दाखविणे हे तरूणींसाठी निश्चितच प्रेरणादायी चित्र आहे. इतर तरूणींसमोर आदर्श निर्माण करणारी निदा खान सांगत होती. ती म्हणाली, लहानपणापासूनच सामाजिक कार्य करण्याची इच्छा होती. बी. एस्सी. करुन एमएससीआयटी केले. मात्र काय काम करू असा प्रश्न पडला. काहीतरी वेगळे करण्याची जिदद खुणावत होती. तेव्हा असीम फाउंडेशनने मदतीचा हात दिला. सफरचंद हे काश्मिरची खासियत. त्यामुळे सफरचंद आणि आक्रोडच्या कुकीज बनविण्याचा बेकरी व्यवसाय सुरू केला. कोशूर क्रंच पासून अ‍ॅपल वॉलनट कूकीजची निर्मिती करण्यास सुरूवात केली.  सध्या माझ्यासह या बेकरीत ७ महिला काम करीत आहेत. तिने तयार केलेल्या कोशूर क्रंच कुकीजला चेन्नई, बंगळुरू, मुंबई आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तरूणींच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी तिने आॅल इंडिया वुमन्स असोसिएशनची स्थापना केली आहे. तांत्रिक क्षेत्रातून व्यवसायाकडे वळणे हे तितके सोपे नव्हते. मात्र आईवडिलांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. तरूणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी एक माध्यम बनले याचा आनंद अधिक आहे. 

मी करू शकते तर इतरजणी देखील करू शकतात. फक्त इच्छाशक्ती आणि जिद्द हवी. काश्मिरमधील मुलींना माझ्याकडे पाहून प्रेरणा मिळाली पाहिजे, म्हणून एक पाऊल पुढे टाकले. - निदा खान , काश्मिरी महिला उद्योजक

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPuneपुणे