शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार अचानक पिंपरी चिंचवडमध्ये दाखल; कोरोनाचा परिस्थितीचा घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 19:11 IST

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याचे शासन व प्रशासनापुढे आव्हान आहे.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयाला दिली भेटशहरातील रुग्णसंख्या, सर्व्हेक्षण, उपाययोजना आदींचा आढावा

पिंपरी : पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याचे शासन व प्रशासनापुढे आव्हान आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (दि. ३) पिंपरी-चिंचवड शहराला ‘सरप्राईज व्हिजिट’ दिली. पवार यांनी यावेळी महापालिका मुख्यालयातील कोरोना वॉर रुमला भेट देत शहरातील कोरोना रुग्णसंख्या, सर्व्हेक्षण, उपाययोजना आदी परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. मात्र, ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरची पाहणी करण्याचे त्यांनी टाळले. 

पिंपरीत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याचे शासन व प्रशासनापुढे आव्हान आहे. त्या अनुषंगाने पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम आणि चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. ऑटो क्लस्टर येथील सेंटर महापालिकेने उभारले आहे. या सेंटरची पाहणी करून कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पवार यांनी गुरुवारी शहराला भेट दिली. दुपारी तीन वाजतापासून महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मुख्यालयातील कोरोना वॉर रुममध्ये महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सादरीकरण करून कोरोनाबाबतची माहिती दिली. शहरातील रुग्णसंख्या, सर्व्हेक्षण, उपाययोजना आदींबाबत पवार यांनी आढावा घेतला.प्लाझ्माबाबत काय परिस्थिती आहे, असे पवार यांनी विचारले. आवश्यक असलेल्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपीनुसार उपचार केले जातात. कोरोनामुक्त रुग्णांकडून प्लाझ्मादान केले जाते. त्यासाठी महापालिकेकडून सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. महापालिकेला त्वरित मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी केरळ येथील परिचारिकांच्या पर्यायाचा विचार केला जात होता. मात्र त्यांच्याकडून दरमहा ४५ हजार रुपये मानधनाची मागणी झाली. याबाबत शरद पवार यांनी आयुक्तांना विचारले. केरळच्या एका परिचारिकेला दरमहा ४५ हजार रुपये मानधन द्यावे लागले असते, त्याच पद्धतीने महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या परिचारिकांकडून देखील तितक्याच मानधनाची मागणी होऊन त्यांनाही तेवढेच मानधन द्यावे लागले असते. त्यामुळे केरळच्या परिचारिकांची भरती केली नाही, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. 

जॉर्ज फर्नांडिस यांच्या उपस्थितीत घेतली होती बैठकशहरातील संरक्षण दलाच्या जागा, रेडझोन आदी प्रश्नांबाबत २००२ मध्ये तत्कालीन दिवंगत संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात बैठक झाली होती. त्यावेळी शरद पवार देखील उपस्थित होते. त्यानंतर तब्बल १८ वर्षांनंतर पवार यांनी महापालिका मुख्यालयाला भेट दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याSharad Pawarशरद पवारshravan hardikarश्रावण हर्डिकर