शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘संशयकल्लोळ’ला शरद पवारांची हजेरी; दोन तास बसून पाहिले संगीतनाटक

By श्रीकिशन काळे | Updated: October 2, 2023 15:13 IST

मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षारंभानिमित्त गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट यांनी संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले होते...

पुणे : राजकारणातील ज्येष्ठ अनुभवी नेते शरद पवार हे कलारसिक देखील असल्याचे आज पुणेकरांना अनुभवायला मिळाले. संगीत नाट्यमहोत्सवाच्या सांगता समारंभाला ते उपस्थित राहिले आणि संगीत नाटकाचा पहिला अंक दोन तास बसून पाहिला. त्यामुळे उपस्थित रसिक देखील त्यांचे कौतूक करत होते. यामधून शरद पवार यांनी आपण देखील अस्सल रसिक असल्याचे दाखवून दिले. 

मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षारंभानिमित्त गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट यांनी संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले होते. त्याच्या सांगता समारंभाला राष्ट्रवादी कॉग्रेेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यांनी गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत ‘संशयकल्लोळ’ हे नाटक पाहिले. राजकीय व सामजिक जीवनात वावरत असताना कला क्षेत्रातही पवार यांचे नाव घेतले जाते. कारण या क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. सोमवारी सकाळीच पवार बालगंधर्व रंगमंदिर येथे दाखल झाले आणि संगीत नाट्य महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात सहभागी झाले. सांगता सोहळ्यानंतर पवार लगेच निघून जातील, असेच सर्वांना वाटत होते. परंतु, त्यांनी दोन तास बसून संगीतनाटकाचा आस्वाद घेतला. ‘संशयकल्लोळ’च्या पहिल्या अंकाचा पडदा पडल्यानंतर ते तिथून निघाले.

पवार यांच्याशी बोलण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर बालगंधर्व रंगमंदिराच्या व्हीआयपी रूममध्ये उपस्थित हाेते. परंतु, पवार हे माध्यमांशी न बोलताच तिथून निघून गेले. सांस्कृतिक कार्यक्रमाला राजकीय बोलायचे नसते, हाच नियम जणूकाही त्यांनी प्रत्यक्षात उतरवला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड