शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 08:47 IST

Junnar Assembly Constituency : विधानसभा निवडणुकांची काही दिवसातच घोषणा होऊ शकते, या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

Junnar Assembly Constituency ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून खासदार शरद पवारही अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. दोन दिवसापूर्वी इंदापूरमधील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, आता जुन्नर विधानसभेची चर्चा सुरू आहेत. अजित पवार गटातील आमदार अतुल बेनकेंविरोधात खासदार शरद पवार निष्ठावंत शिलेदार मैदानात उतरवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रि‍पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट झाली. यानंतर जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळाले. आता काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं दिसत आहे.

काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी

विधानसभा निवडणुकीत अनेक विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकमेकांविरोधात लढणार असल्याचे चित्र दिसत आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघात आमदार अतुल बेनके यांच्याविरोधात खासदार शरद पवार तगडा उमेदवार देणार असल्याचे दिसत आहे. जुन्नरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ज्या नावांची चर्चा आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचे जुन्नर विधानसभा समन्वयक मोहित ढमाले यांचाही समावेश आहे. 

जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ देणे पसंत केले.  त्यामुळे या मतदारसंघात आता शरद पवार यांच्याकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. अशातच पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेल्या आणि लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना जुन्नर तालुक्यातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मोहित ढमाले यांच्या नावाचा शरद पवार यांच्याकडून विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून काम पाहत असलेल्या मोहित ढमाले यांनी २०१७ ते २०२२ या काळात जिल्हा परिषद सदस्यपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे.

मोहित ढमाले यांनी  उमेदवारीची केली मागणी

दरम्यान, मोहित ढमाले यांनी  पक्षाकडे विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांना शरद पवार उमेदवारी देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभा