शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अरुण साधू, सिंहासन आणि शरद पवार : पुण्यात जागवल्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 14:33 IST

नोट ''ओव्हररूल'' करण्यात माझा हातखंडा असल्याने तसे करत मी मुख्यमंत्री कार्यालय व निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले अन् त्यातून अप्रतिम कलाकृती निर्माण झाली.

पुणे : अरुण साधू यांचे लिखाण कायमच मराठी भाषेची उंची राखणारे होते अशा शब्दात असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंहासन चित्रपटाच्या आठवणी जागवल्या. अरुण साधू यांच्या स्मृत्यर्थ विज्ञानापासून सामाजिक विषयापर्यंत संशोधन करणाऱ्या विद्यार्थी, पत्रकारांना आर्थिक पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. या योजनेच्या घोषणेसाठी ग्रंथाली, अरुण साधू कुटुंबीय व मित्रमंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी साधू यांच्या कादंबरीवर आधारित झिपऱ्या चित्रपटाचा खेळही दाखविण्यात आला.या प्रसंगी पवार बोलत होते. व्यासपीठावर खासदार कुमार केतकर, डॉ उज्ज्वला बर्वे, अरुणा साधू, अश्विनी दरेकर उपस्थित होते.        यावेळी पवार म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना सिंहासन चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. त्यावेळी कथेच्या मागणीनुसार  मुख्यमंत्री कार्यालय आणि निवासस्थान  चित्रीकरणासाठी   उपलब्ध करून देण्याची विनंती दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी केली होती. त्यावेळी अशा प्रकारे  चित्रपटासाठी  मुख्यमंत्री कार्यालय उपलब्ध करून देणे अयोग्य असल्याची टिप्पणी सामान्य प्रशासन विभागाने पाठवली होती. मात्र अशा नोट ''ओव्हररूल'' करण्यात माझा हातखंडा असल्याने तसे करत मी मुख्यमंत्री कार्यालय व निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले अन् त्यातून अप्रतिम कलाकृती निर्माण झाली, अशी आठवण त्यांनी सांगताच उपस्थितांनी हसून दाद दिली. केतकर यांनी बोलताना ही शिष्यवृत्ती म्हणजे साधू यांना आदरांजली वाहण्यासाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले. या मार्फत पत्रकारितेशी निगडीत अथवा निगडीत नसलेल्या पण संशोधन करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJabbar Patelजब्बार पटेल