शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी आता राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे : सायरस पूनावाला

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: August 30, 2023 21:10 IST

पुनावाला आणि पवार यांची मैत्री सर्वांना विख्यात आहे...

पुणे :शरद पवार फार हुशार व्यक्ती असून ते जनतेची चांगली सेवा करू शकले असते. मात्र आता त्यांचं वय झालं आहे. त्यामुळे त्यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि आराम करावा, असा सल्ला शरद पवारांचे जीवलग मित्र आणि जगातील सर्वाधिक माेठ्या लस तयार करणा-या सिरम इन्सिट्युटचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी पवारांना पुण्यात दिला. पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.

पुनावाला आणि पवार यांची मैत्री सर्वांना विख्यात आहे. त्यातच हे महत्वाचे विधान केले आहे. सायरस हे राेखठाेक बाेलण्याबाबत परिचित आहेत. यावेळी पत्रकारांनी शरद पवारांबाबत पुनावाला यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले, पवार यांना दोन वेळा पंतप्रधान बनण्याची संधी होती, मात्र त्यांनी ती घालवली. आता त्यांनी निवृत्त व्हावे असा सल्ला दिला आहे. त्यामुळे शरद पवार हे पूनावाला यांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात, हे आता लवकरच समाेर येईल. सेवानिवृत्तीच्या विधानाची चर्चा सर्व ठिकाणी रंगली हाेती.

अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शरद पवारांच्या भूमिकेशी फारकत घेत सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या वयावरून थेट भाष्य करत त्यांनी थांबायला हवे असे म्हणत अजित पवारांनी त्यांना निवृत्त होण्यास सांगितलं होते. त्यानंतर शरद पवार यांनी उगाच वया-बियाच्या भानगडीत पडू नका, वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा इशारा त्यांनी अजित पवार गटाला दिला होता. मात्र आता त्यांच्या मित्रानेच थेट निवृत्तीचा सल्ला दिल्याने त्यावर शरद पवार काय भुमिका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवार