शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

चंद्रकांत पाटील म्हणाले, पवारांचा आजवरचा राजकीय इतिहास हा खोटं बोलण्याचाच...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 17:15 IST

मोदी आणि पवारांचं नेमकं काय बोलणं झालं हे सांगण्या इतपत मी मोठा नेता नाही...

पुणे : नरेंद्र मोदींनी (narendra modi) त्यावेळी राष्ट्रवादीला सरकार स्थापन्याची ऑफर दिली होती. असे शरद पवार (sharad pawar) कितीही सांगत असले तरी, पवारांचा आजवरचा राजकीय इतिहास हा खोटं बोलण्याचाच राहिला आहे. असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केला. दरम्यान भाजपचे राज्यात सरकार कधी येणार असे विचारताच, त्यांनी  ' नया साल नई उमंग' असा नवा नारा देत आपला आशावाद कायम ठेवला.

पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, मोदी आणि पवारांचं नेमकं काय बोलणं झालं हे सांगण्या इतपत मी मोठा नेता नाही, पण शरद पवारांचा बोलण्याचा इतिहास अगदीच खरा आहे असंही नाही. पाच दिवसांच्या अधिवेशनात समाजाचा कुठलाच प्रश्न मार्गी लागलेला नाही. महाविकास आघाडी सरकारने फक्त बहुमताच्या जोरावर स्वतः च्या फायद्याचे विद्यापीठ सुधारणा कायद्यासह १९ विधायके मंजूर करून घेतली आहेत. पेपर फुटीवरही भूमिका नाही, वीज बील माफीवर सभागृहात चर्चा नाही, केवळ ३२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सरकारने  मान्य करून घेतल्या असल्याचे पाटील म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही नियमबाह्य पद्धतीने पुढे रेटण्याचा या अधिवेशनात प्रयत्न झाला, पण आम्ही तो हाणून पाडला. यावेळी सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना खरमरीत पञ लिहून दमबाजीचाही प्रयत्न केला. पण राज्यपालांनी कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घेण्याचा पवित्रा घेतला. तेव्हा ज्या नेत्याच्या सल्ल्याने हे आघाडी सरकार चालते, त्या रिमोट कंट्रोलने फोन करून राष्ट्रपती राजवट लागेल अशी शक्यता व्यक्त केली. त्यामुळे या अधिवेशनात अध्यक्ष निवड न करता अधिवेशन गुंढळण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, आघाडी सरकारचा एक मोठा नेता प्रचारासाठी उपलब्ध नसल्यामुळेच, महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या असाव्यात, ओबीसी आरक्षणाचं फक्त नाव असल्याचे ते यावेळी म्हणाले. नितेश राणे कारवाई प्रकरणी बोलताना पाटील यांनी, पोलिसांवर कोण दबाव टाकतंय, तिथल्या एसपीना कोण फोन करतंय?  हे सर्वांना ठाऊक आहे, पण राणे या सगळ्यांना पुरून उरतील असे ते म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडchandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी