शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार गॉडफादर, मग ठाकरे सरकारच्या निर्णयाचा दोष त्यांच्यावर जाणारच; चंद्रकांत पाटील यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 12:58 IST

शत्रूशी देखील अडचणीत चौकशी करण्याची आपली sanskruti-, पवार फडणवीस भेटीवर पाटलांचे वक्तव्य आरक्षण प्रश्नी खुल्या चर्चेचं दिलं आव्हान

शरद पवार हे सर्वांचे गॅाडफादर आहेत. महाविकास आघाडीत सगळे त्यांचे ऐकतात. त्यामुळे कोणत्याही निर्णयाचा दोष त्यांच्यावर जाणारच असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाबत सुरु असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने  भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पवार आरक्षण प्रश्नाला जबाबदार असल्याचे म्हणले होते. त्या पारश्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. इतकंच नाही कर आरक्षण प्रश्नी आपण थेट डिबेटला तयार असल्याचेही त्यांनी म्हणले आहे. 

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाटील बोलत होते. “ जून ला कोणाच्याही ध्यानीमनी नसताना मुंडेंचे निधन झाले. आज ७ वर्ष झाली. दुपारी डाक विभाग त्यांच्यावर एक एन्व्हलप करत आहे. सतत संघर्ष हे त्यांचे ध्येय होते. कार्यालयातली पार्टी त्यांनी रस्त्यावर आणली. “ 

सध्याच्या भेटीगाठी हा संघर्ष संपवण्यासाठी आहेत का असं विचारल्यावर पाटील म्हणाले “ भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही. भेटीगाठी अनेक कारणांनी सुरु आहेत. पवार आजारी आहेत ही त्यांची चौकशी करायला. रक्षा खडसेंची भेट देखील घेतली. दुश्मन जरी असला तरी भेट घेणं ही संस्कृती” 

पुण्यात झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या वादाबाबत बोलताना पाटील म्हणाले “ संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. वाद होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. जर संवाद नसेल तर अडचण असते. पण इथे ते आहे त्यांमुळे काळजी करण्याचे कारण नाही. “ 

आरक्षण प्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले “ पडळकरांनी काही भुमिका मांडली आहे. पवार सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. तसं म्हणल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो. याविषयी खुली डिबेट करायची माझी तयारी आहे. मी निकाल वाचला. त्यात पावला पावलावर जाणवतंय की चुका आहेत. ॲार्डिनन्सचा कायदा केला नाही.”

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण