शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'उद्धव ठाकरे, एकदा तरी मैदानात उतरा, माझा बारका पैलवान तुम्हाला चीतपट करेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 06:52 IST

ज्यांना आयुष्यात मैदानच माहीत नाही. त्यांनी एकदा तरी मैदानात यावे, असे आव्हान माजी केद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना आज दिले.

मंचर (जि. पुणे) : शरद पवारांनी लोकसभेचे मैदान सोडले, अशी गमतीची गोष्ट शिवसेनेचे पक्षप्रमुख जाहीर सभांमधून सांगताहेत. ज्यांना आयुष्यात मैदानच माहीत नाही. त्यांनी एकदा तरी मैदानात यावे, असे आव्हान माजी केद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनाआज दिले. या रस्त्याला जाण्याचा विचार करू नका, तुमचे ते काम नव्हे. मैदानात आल्यावर माझी गरज भासणार नाही. रेवडीवर कुस्ती खेळणारा माझा बारका-सारका पैलवान तुम्हाला चीतपट करेल, असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी कॉँग्रेस, काँग्रेस आघाडीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मंचर येथे शरद पवार यांची जाहीर सभा आज झाली.

पवार म्हणाले, १४ वेळा लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवून माझा एकदाही पराभव झालेला नाही. पुढील वर्षी ८० वय होत असून नवीन पिढीला संधी मिळावी. यासाठी कुठेतरी थांबले पाहिजे, अशी भूमिका मी घेतली. मात्र, शरद पवारांनी मैदान सोडले. अशी गमतीची गोष्ट उद्धव ठाकरे जाहीर प्रचार सभांमधून सांगताहेत. ठाकरे यांनी एकदा तरी मैदानात यावे. तुम्हाला पराभूत करण्यासाठी माझी आवश्यकता भासणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे चांगले मित्र होते. त्यांनी संघटना उभी केली. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्टाच्या कानाकोपऱ्यात जाऊन मला शिव्या घालण्याचे काम करताहेत. शेतकऱ्यांसाठी हे करणार, ते करणार अशा वल्गना केल्या जातात. राज्यात, केंद्रात सत्ता असताना शेतकऱ्यांचे प्रश्न का सोडवले नाही, असा सवाल त्यांनी केला.

‘नोटाबंदीमुळे १५ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या’काँग्रेसच्या राजवटीत विकासाला महत्त्व देत शेतकरी आणि कामगार वर्गाचे हित पाहिले. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून देशाचा विकास करण्यात आला. आता चित्र बदलले आहे. नोटाबंदी हा मोदींनी अविचाराने घेतलेला निर्णय आहे, त्यामुळे राज्यातील १५ लाख लोकांची नोकरी गेली. अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रचारादरम्यान तळेगाव दाभाडे येथे केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारshirur-pcशिरूर