शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

"पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली", शरद पवार यांचं मोठं विधान; केला मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 12:55 IST

पहाटेच्या शपथविधीबाबत अधिक बोलण्यास अजित पवार वारंवार नकार देत असतात.

पुणे-

पहाटेच्या शपथविधीबाबत अधिक बोलण्यास अजित पवार वारंवार नकार देत असतात. तर राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांना कल्पना होती असं विधान करत खळबळ उडवून दिली होती. याबाबत आता थेट शरद पवार यांनीच मोठं विधान केलं आहे. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली नसती, असं मोठं विधान शरद पवार यांनी केलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पॉलिटिकल मिस्ट्री सुरू आहे ज्यावर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. फडणवीस म्हटले होते की अजित पवारांसोबत जे सरकार झालं त्याची माहिती शरद पवारांना होती. अजित पवार देखील याबाबत काहीच बोलत नाहीत. नेमकं काय घडलं होतं ते तुम्हीच स्पष्ट करा, असा सवाल शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. त्यावर पवारांनी केलेल्या विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

"सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली. ती उठल्यानंतर काय घडलं ते तुम्हा सर्वांनाच माहित आहे", असं शरद पवार म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. राज्यात तेव्हा तसं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का?, असं शरद पवार म्हणाले. 

महाराष्ट्रात काही झालं की एका व्यक्तीचं नाव येतंशरद पवारांनी केलेल्या विधानावर म्हणजे जे सगळं घडलं त्याला तुमचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता का? राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी हे सारं केलं गेलं होतं का? असा प्रतिप्रश्न केला गेला असता पवारांनी महाराष्ट्रात काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव येतं हे आपल्या राज्याचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल असं मिश्किल उत्तर दिलं. लातूरला भूकंप झाला त्याला कारणीभूत देखील मीच होतो असंही बोललं गेलं, असंही पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार