शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 21:24 IST

बारामती येथे आयोजित महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. 

बारामती दि. ५ (प्रतिनिधी) : "आज सर्वत्र पाणी,शेती,बेकारीचा प्रश्न आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्तेचा वापर होताना दिसून येत नाही.यासाठी वेगळा निकाल हाती घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे देशाला नवीन दिशा देण्याचे काम केले जाईल. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे," असं मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद  पवार यांनी व्यक्त केलं आहे. बारामती येथे आयोजित महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. 

पवार पुढे म्हणाले, बारामतीची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या हिताचाच निकाल होईल. अनेक वर्ष शेवटची सभा मिशनच्या ग्राउंडवर होत असे. मात्र, यंदा राज्यातील सत्ताधाऱ्यांनी ती जागा ताब्यात घेतल्याने आपल्याला ती मिळाली नाही. कोणी जागा अडविली तरी नुकसान होऊ शकत नाही, हे आजच्या सभेतील गर्दीने सिद्ध झाल्याचे पवार म्हणाले. 

यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,गेले १० महिने खूप रडले. इतके रडले की आता अश्रू येत नाहीत. तुम्हाला पक्ष,महाराष्ट्र,कुटुंबाची  किंमत नसेल तर कोणासाठी रडायचे? असा सवाल  सुळे यांनी केला.विरोधक मोदी,शाह यांच्यासोबत संबंध चांगले असल्याचे सांगतात. त्यांनी ते सबंध शेतकऱ्यांसाठी वापरावे, असा टोला सुळे यांनी अजित पवार यांना लगावला. त्यांच्या कामात केव्हाच हस्तक्षेप केला नाही. त्यांचा कायम मान राखला. त्या संस्कारी वागण्यासाठी माझ्यावर टीका केली जाते का,असा देखील सवाल सुळे यांनी अजित पवार यांना केला.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले,आजच्या सभेतील गर्दीने बारामतीकरांच्या मनात, काळजात काय हे दाखवून दिले आहे.

यावेळी माजी मंत्री सुनील केदार,माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी खासदार वंदना चव्हाण, आमदार रोहित पवार, भूषणसिंह राजे होळकर,अंकुश काकडे, विठ्ठल मणियार तसेच प्रतिभा पवार यांच्यासह पवार कुटुंबीय उपस्थित होते. ...१८ वर्ष तुम्ही पालकमंत्री होता

मी बारामतीची लेक आहे.मुलांप्रमाणे मुलींना देखील अधिकार आहेत. आमचे दिवस मोजू नका, १८ वर्ष तुम्ही पालकमंत्री होता, इतर तालुक्यात किती वेळा गेला,असा सवाल सुळे यांनी केला. काहीजण म्हणतात,समोरचे भावुक होतील.शेवटची निवडणूक असल्याचे सांगतिल, रडतील.मात्र, त्यांना माझे सांगणे आहे.शेवटची की काय, तो निर्णय माझा पांडुरंग घेईल. तुमच्यासारखे आमचे बुरसटलेले विचार नाहीत. त्या विचारांच्या आम्ही नादी लागणार नाही. सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर असेपर्यंत कोणी माइका लाल आमचं काही करु शकणार नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर केली. दरम्यान, आजच्या सभेत शरद पवार यांचा घसा बसल्याने त्यांनी भाषण आटोपते घेतले. पवार यांनी घसा बसल्याचा उल्लेख भाषणात केला. अवघ्या सात मिनिटात पवार यांनी भाषण आटोपते घेतले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbaramati-pcबारामतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Sunetra Pawarसुनेत्रा पवारSupriya Suleसुप्रिया सुळे