शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शंकराचार्य हे एकप्रकारची शक्ती - सुमित्रा महाजन; शंकराचार्य पुरस्कार प्रदान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:29 IST

जगदगुरू शंकराचार्याने भारतभ्रमण केले आणि त्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले. देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने शंकराचार्य यांनी गोवर्धन पीठ, श्रृंगेरी पीठ, शारदापीठ आणि ज्योर्तिमठ अशा भारताच्या चार दिशांना चार पीठांची स्थापना केली.

पुणे : जगदगुरू शंकराचार्याने भारतभ्रमण केले आणि त्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले. देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने शंकराचार्य यांनी गोवर्धन पीठ, श्रृंगेरी पीठ, शारदापीठ आणि ज्योर्तिमठ अशा भारताच्या चार दिशांना चार पीठांची स्थापना केली. जगदगुरू शंकराचार्य आपणास मिळालेले देणे आहे. अशा कार्यक्रमातून आम्हाला एक प्रकारची शक्ती मिळते, असे प्रतिपादन लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी केले.आद्य शंकराचार्य जयंती महोत्सवानिमित्त श्रुतिसागर आश्रमातर्फे ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांना भगवत्पूज्यपाद आदी शंकराचार्य पुरस्कार आणि वेदमूर्ती श्रीधर अडी यांना वेदसंवर्धन पुरस्कार सुमित्रा महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी महापौर मुक्ता टिळक, कुडली श्रृंगेरी मठाचे शंकराचार्य विद्याभिनव शंकरभारती महास्वामी, श्रुतिसागर आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वती, स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब तराणेकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी, अमरावती विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. एस. टी. देशमुख आदी उपस्थित होते.महाजन म्हणाल्या, आपल्या देशातील सुराज्य आणि सुशासनाची परंपरा रामायण-महाभारतापासून चालत आलेली आहे. मंगोलिया देशातील लोक बौद्ध धर्म स्वीकारून भारताकडे पाहात आहेत. आपण त्यांना जवळ करावे, असे वाटते. भारतातील दगडसुद्धा व्हिएतनाममध्ये सांभाळून ठेवले जातात. आपणास याबद्दल काहीच माहिती नाही. प्रत्येकाने देश समजावून घेणे गरजेचे आहे.महापौर टिळक म्हणाल्या, दांभिकतेमुळे समाज भरकटत जात आहे. समाज भरकटू नये, यासाठी श्रुतिसागर आश्रमाकडून कार्य केले जात आहे. माणिकप्रभूमहाराज म्हणाले, हा सन्मान माझा नाही तर गुरू परंपरेचा सन्मान आहे. स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती म्हणाल्या, आज समाजात दांभिकता वाढलेली आहे. धर्माचे अधिष्ठान सगळ्यांना लाभावे, यासाठी सर्व संत आपणास मार्गदर्शक केले आहे. प्रास्ताविक उदय जोशी यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेSumitra Mahajanसुमित्रा महाजन