शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
2
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
3
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
6
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
7
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
8
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
9
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
10
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
11
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
12
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
13
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
14
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
15
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
16
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
17
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
18
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
19
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
20
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारवाडा ’व्यासपीठ’ म्हणून कार्यक्रमांना देण्याबाबत अधिकार महापौरांना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:01 IST

 काही कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या सामाजिक तणावामुळे शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याबाबतचे निर्णय काही महिन्यांपूर्वी तत्कालिन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केला होता.

ठळक मुद्देपक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय : रोख रकमेऐवजी मानपत्र देणाररस्ते, चौकांच्या तसेच सार्वजनिक वास्तूंच्या नामकरणाबाबतही चर्चा

पुणे : महापालिकेने शनिवार वाड्यासमोर बांधलेले व्यासपीठ कार्यक्रमांसाठी म्हणून देण्याचे सर्वाधिकार महापौरांना देण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेत झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. याचे धोरण ठरवून त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. रोख रकमेच्या पुरस्काराला सरकारी निर्बंध आल्यामुळे यापुढे मानपत्र देऊन कार्यक्रम करण्याचा महत्वाचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. काही कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या सामाजिक तणावामुळे शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याबाबतचे निर्णय काही महिन्यांपूर्वी तत्कालिन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केला होता. गुप्तचर खात्याच्या अहवालानुसार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यावर सर्वच थरातून टीका झाली. खुद्द महापौरांनीच आयुक्तांना त्यांचा हा निर्णय त्यांनी त्वरीत मागे घ्यावा असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे हा निर्णय आयुक्तांनी मागे घेतला. त्यानंतर हा विषय प्रलंबित होता. शुक्रवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली व त्यासंबधीचे सर्व अधिकार महापौरांना द्यावे असा ठराव करण्यात आला. रस्ते, चौकांच्या तसेच सार्वजनिक वास्तूंच्या नामकरणाबाबतही चर्चा झाली. एकदा दिलेले नाव बदलता येणार नाही, चार नगरसेवकांच्या प्रभागात तिघांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल, ज्यांनी महापालिकेला विनामोबदला जमीन दिली आहे, त्यांची मागणी असेल तर त्यांचे नाव देता येईल असे काही नियम याबाबतीत करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले की शनिवार वाडा पटांगण जाहीर कार्यक्रमांना देणे तसेच नामकरण या दोन्ही गोष्टींबाबत महापालिकेचे धोरण आहेच, मात्र त्यात काही त्रुटी होत्या, त्यात दूर करून नव्याने काही नियम करण्यात येतील व त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल.महापालिकेच्या वतीने दरवर्षी अनेक पुरस्कार देण्यात येत असतात. त्यातील रोख रकमांना सरकारी निर्बंधामुळे मर्यादा आली आहे. त्यामुळे हे पुरस्कार बंद करण्यात आले होते. मात्र त्याबाबत ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी महापालिकेकडे रोख रकमा बंद झाल्या असल्या तरी पुरस्कार बंद करू नये, संबधितांना मानपत्र द्यावे अशी मागणी केली होती. पक्षनेत्यांच्या बैठकीत ही मागणी मान्य करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. त्यानुसार आता पुरस्कार प्राप्त व्यक्तींना जाहीर कार्यक्रमात महापालिकेच्या वतीने मानपत्र प्रदान करण्यात येईल असे त्या म्हणाल्या. ..................लाल महालात शहाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव होता. तळजाई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी होती. शहरात कोणताही पुतळा सार्वजनिक ठिकाणी बसवण्याबाबत राज्य सरकारने एक धोरण तयार केले आहे. त्याला अनुसरून याबाबत निर्णय घेतला जावा असे पक्षनेत्यांच्या बैठकीत ठरवण्यात आले. महापौर मुक्ता टिळक व सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी याची माहिती दिली.

 

टॅग्स :Puneपुणेshanivar wadaशनिवारवाडाMukta Tilakमुक्ता टिळकShrinath Bhimaleश्रीनाथ भिमाले